सेलूत भाजपाच्या वतिने जिंतूर येथील घटनेचा निषेध.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधि परभणी.


दोषींवर कठोर कारवाहीची मागणी.

सेलू : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विषयी इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट केल्यामुळे जिंतूर येथील एका जणावर गुन्हा दाखल करून त्याला पाठबळ देणा-या नेत्यावर कठोर कारवाहीची मागणी भाजपाच्यावतिने सोमवार २४ रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  मागील काही दिवसांपासुन मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्यावरून आरोप प्रतीआरोपाचे सत्र सुरू आहे परिणामी याची धग गावखेड्या पर्यंत पोहचली आहे.जिंतूर तालूक्यातील अल्पवयीन मुलाने भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बदल इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट केली.सदरिल मूलासह त्याला पाठबळ देणा-या नेत्यावर कठोर कारवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्यावतिने करण्यात आली आहे.यासाठी भागवत दळवे,अँड.दत्तराव कदम,अशोक अंभोरे, गणेश काटकर, अँड.
रामेश्वर शेवाळे,संदिप बोकन,बाळू काजळे,
अजय डासाळकर,राजू सोळंके,नामदेव झिंबरे दिलीप मगर,एकनाथ सारूक,अभय महाजन,प्रकाश शेरे,
महेश नावाडे,सूदाम रोकडे,प्रल्हाद गोरे आदींनी पूढाकार घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.