माजी ग्राम पंचायत अध्यक्षांच्या पतीचा खून

वार्ताहर एकसंबा 

एकसंबा येथील माजी ग्राम पंचायत अध्यक्षांच्या पतीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी 17 रोजी सकाळी बिरेश्वर नगरात उघडकीस आली. महांतेश श्रीमंत कुरणी (वय 48) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदलगा पोलिस ठाण्यातर्फे पंचनामा करण्यात आला असून सदर प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. 
      या घटनेविषयी अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी बिरेश्वर नगर येथे राहणाऱ्या व्यक्तींना एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याचे आढळून आले. सदर माहिती गावातील पुढाऱ्यांमार्फत सदलगा पोलिसांना कळविण्यात आली. सकाळी घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन स्थानिकांची विच्यारापूस केली. दरम्यान रविवारी रात्री यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रम पाहून रात्री 2 च्या सुमारास अनेकजण घरी परतले त्यावेळी त्या ठिकाणी काहीच नव्हते असे स्थानिकांनी सांगितले. यामुळे सदर घटना पहाटे घडली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.
       सदलग्याचे फौजदार बिरादार, सीपीआय , एसपी व सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या नातेवाईकांशी या घटनेबाबत विचारपूस करण्यात आली.  सदर बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सदर भाग सिल केला होता. दुपारी सारी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.  मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.