मोफत आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, बावनसौंदत्ती ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे.

रायबाग ; तालुक्यातील बावनसौंदत्ती गावात मोफत आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे यांनी सांगितले.   

 गावात, जिल्हा पंचायत बेळगाव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने जनकग्राम पंचायत आवारात पाच दिवसांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

 प्रत्येकाने आपल्या घराभोवती स्वच्छता ठेवली तर आजार येणार नाहीत.  याचा लाभ गावातील लोकांना व्हावा यासाठी शासनाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असून त्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

                  ग्रा.पं.चे उपाध्यक्ष आझाद तासेवाले, ग्रामस्य धुळागौडा पाटील, अनिल हंजे, अजित खेमलापुरे, अरुण शिंदे, संतोष मंगसुळे, प्रकाश जानाजा, विकास अधिकारी एस.एस.न्यामगौड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.