उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव एसएससी बॅच 1983 - 84 विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा
जयसिंगपूर प्रतिनिधी - उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव एसएससी बॅच 1983 84 विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा ८ जून 2024 रोजी उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव येथे पार पडला. विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे पुष्प वर्षावाने स्वागत करण्यात आले देसाई शाळेच्या शिक्षिका उमराणे व मगदूम मॅडम हजर होत्या. शाळेची प्रार्थना झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. सर्वांनी मनमोकळेपणाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला बऱ्याच विद्यार्थिनी ना अश्रू अनावर झाले. तसेच फनी गेम्स व गीत गायनाचा सुंदर कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन त्रिश ल चौगुले यांनी अतिशय सुंदर रित्या पार पाडले. त्रिश ल पोवळे कांबळे मॅडम यांनी अतिशय सुंदर गायनाचा कार्यक्रम सादर केला.सदर कार्यक्रमाचे नियोजन रामभाऊ बंडगर इलाई जमादार शरद वरेकर चंद्रकांत गडकरी दिलीप सूर्यवंशी जहांगीर मुजावर सुरेश कांबळे शोभा फडतरे व सुलोचना कोळी यांनी केले. सर्वच विद्यार्थिनी व विद्यार्थी सायंकाळी फार मोठी ऊर्जा घेऊन सर्वांनी. परत परत अशाच पद्धतीने एकत्र येऊ असा निर्धार व्यक्त करून निरोप घेतला.
टिप्पण्या