पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एसटी डेपो नांदेड आगाराचे दोन कर्मचारी सेवानिवृत्त; निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

इमेज
नांदेड- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथील विविध पदावरील दोन कर्मचारी वयाचे ५८ वर्षे पूर्ण करुन प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल दि. ३० जून २०२४ रविवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता आगार कामगार कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. यामध्ये वाहतुक नियंत्रक गंगाधर विठ्ठलराव वाघमारे (३५ वर्षे सेवा), चालक नंदीअप्पा देविदास मठपती (२० वर्षे सेवा) सेवा बजावणाऱ्या या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सर्वप्रथम बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांच्या हस्ते दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक पुष्पहाराने हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हारकळ, श्रीनिवास रेणके, कामगार नेते चंद्रकांत कदम, बसस्थानक प्रमुख यासीन हमीदखान, सहाय्यक वाहतुक निरीक्षक शेख मोबीन, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वाहतुक नियंत्रक उदय पांडे, निर्दोष पवार, सारंग मठपती, सौ. सविता गंगाधर वाघमारे, आर...

मोफत आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, बावनसौंदत्ती ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे.

इमेज
रायबाग ; तालुक्यातील बावनसौंदत्ती गावात मोफत आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे यांनी सांगितले.     गावात, जिल्हा पंचायत बेळगाव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने जनकग्राम पंचायत आवारात पाच दिवसांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.  प्रत्येकाने आपल्या घराभोवती स्वच्छता ठेवली तर आजार येणार नाहीत.  याचा लाभ गावातील लोकांना व्हावा यासाठी शासनाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असून त्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.                   ग्रा.पं.चे उपाध्यक्ष आझाद तासेवाले, ग्रामस्य धुळागौडा पाटील, अनिल हंजे, अजित खेमलापुरे, अरुण शिंदे, संतोष मंगसुळे, प्रकाश जानाजा, विकास अधिकारी एस.एस.न्यामगौड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि.29 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपन्न केले.  दांडगे गायत्री 77.40%, वडे तन्वी 72.20% तर कुर्हे कोमल 72.00% गुण मिळवून यांनी अनुक्रमे महाविद्यालयातून प्रथम,द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला.त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.सविताताई रोडगे, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य प्रा. अक्षय बन, शैक्षणिक विभागप्रमुख प्रा. महेश कोल्हे, विभागप्रमुख वैभव शिकरे, परीक्षा व मूल्यमापन विभाग प्रमुख प्रा. महादेव खोसे व तसेच आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .

मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढला म्हणून विवंचेतून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  देऊळगाव गात येथील घटना.    सेलू : सेलू तालुक्या तील देऊळगाव गात येथे दिनांक 29 जून 2024 रोजी दुपारी 11:30 ते 12:30 च्या सुमारास संदीप रोहिदास गायकवाड  वय 19 वर्ष राहणार देऊळगाव गात येथील तरुणाने आपल्या राहत्या घरी पत्राच्या लोखंडी पाईपला टॉवेलच्या साह्याने मराठा आरक्षणाचा सगे सोयरेचा  अध्यादेश न काढल्यामुळे व आरक्षण मिळत नसल्यामुळे मला नोकरी मिळेल का नाही या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली असून मयत तरुणाजवळ आरक्षण मिळत नसल्याची चिट्ठी  सापडली आहे.  सदरील तरुण हा जिंतूर येथील शासकीय पॉलिटे क्निक मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग च्या डिप्लोमा चे शिक्षण घेत होता. आत्महत्याची माहिती सेलू पोलीस स्टेशनला मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, पोलीस जमादार ज्ञानेश्वर जानकर, शिवदास सूर्यवंशी, मनोहर कोपनर आदींनी  घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच प्रेत देऊळगाव गात येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उत्तरीय तपासणी डॉक्टर अक्षय काळे यांनी प्रेत  नातेवाईकांच...

अपूर्वा पॉलीटेक्निक मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि.29 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये अपूर्वा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपन्न केले. शेख झाहेद 84.50%, गनगे गोकर्णा 82.38% तर चाळक अश्विनी 80.13% गुण मिळवून यांनी अनुक्रमे महाविद्यालयातून प्रथम,द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवि ला आहे. पारधे महेश- 80.12%, लष्करी फयाजखान-79.06% ठोंबरे प्रतीक्षा 78.44%,जायभाये अभिषेक-78.40%, शेख अबू सुफियान-77.87%, मगर सोनी-77.29 %,राठोड ज्ञानेश्वर-77. 11%, गंधाला पुष्पांजली-76.89%, बरसाले विनायक-76. 44%, काटकर वैष्णवी -75.88%, शेख मुस्ताफिज-74.22%, पठाडेअंजली-73.67%,आर्दडश्रेयश-73.07%भारती विवेक-73.06 %, गुळवे शिल्पा-72. 67%, मुळे पूजा-71. 07%, सावंत विजय- 71.06%, गरड महेश-70.67%, मोहिते माधव-70.27%, शेळके राहुल-70.00% इत्यादि विद्यार्थी गुण मिळवून  विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव ड...

नंदीकुरळी ते नसलापुर मार्गे भोज या नव्याने सुरू करण्यात आलेल्या रायबाग-भोज बससेवेचा शुभारंभ

इमेज
रायबाग: KPCC सरचिटणीस महावीर मोहिते यांच्या हस्ते शुक्रवारी तालुक्यातील नंदीकुरळी गाव ते नसलापुर मार्गे भोज या नव्याने सुरू करण्यात आलेल्या रायबाग-भोज बससेवेचा शुभारंभ नंदीकुरळी गावात करण्यात आला.    यावेळी काँग्रेस नेते मुजीब सय्यद, सुनील जाधव, सुरेश कांबळे, महावीर सप्तसागरे, अम्मप्पा मगदुम, महावीर समाजे, अजित पाटील यांचेसह नंदी कुरळी व नसलापूरचे ग्रामस्थ उपस्थित होते.

सौंदत्ती यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना अपघात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक 13 जण ठार.

इमेज
बेळगाव - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मिनी बस (टॅम्पो ट्रव्हलर) यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. हावेरी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पहाटे सदर अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समजते की, शिवमोग्गाहून मिनी बसने काही भाविक बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी आले होते.सौंदत्ती यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना हावेरी जिल्ह्यातील बागडी तालुक्यातील गुंडेनहल्ली क्रॉसजवळ बस चालकाला वाहनावरील नियंत्रण चुकल्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून मिनी बसने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसचा चक्काचूर झाला. सर्व मृत शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आहेत मृतांमध्ये परशुराम (वय 45), भाग्या (40), नागेश (50), विशालाक्षी (40), अर्पिता (18), सुभद्राबाई (65), पुन्या (50), चालक आदर्श (23), मानस (24), रूपा (40) मंजुळा (50) यांच्यासह अन्य महिला, पुरुष व मुलांचा समावेश आहे. अपघातामध्ये बसमधील 13 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 ...

डॅशिंगबाज पोलीस इन्स्पेक्टर दिलीप वनवे देशाच्या गद्दारांना ठोकणार ...

इमेज
कवि सरकार इंगळी शेवगाव पांडुरंग गोरे - दुश्मन के लिए कोई जगां नही... देश के लिए जिंदगी कुर्बान है...दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा आगामी मराठी चित्रपट बहुचर्चित खाकी.. लय भारी म्हणजेच देशाच्या दुश्मनासाठी लय.. डेंजर आहे , या मराठी चित्रपटाचा मुहूर्त, उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी होणार आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली, खानदेश सॉंग स्टार, सिने अभिनेत्री ऋतुजा पाटील , बॉलीवूड स्टार चित्रा दीक्षित , अभिनेत्री प्रतीक्षा कुलथे, अभिनेत्री प्रचिती चांदणे, अभिनेत्री शिल्पा पवार या दिग्गज सेलिब्रिटीसह सर्वांच्या साक्षीने या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न होणार आहे,  दिलीप वनवे यांनी, संपादक साहेब श्री उद्धव फंगाळ सर, चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग गोरे, पत्रकार संजय लहासे, यांचे आभार मानले आहे,  या चित्रपटांमध्ये दिलीप वनवे हे डॅशिंगबाज इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे , जे देशासाठी आपल्या जीवाची परवा न करता, जीवाची बाजी लावून.. देशाच्या गद्दारांना ठोकण्यासाठी सज्ज झाले आहे, आपला पहिलाच मराठी चित्रपट आणि त्यामध्ये आपली जबरदस्त फर्स्ट एंट्री आहे,  या चित्रपटात मध्ये ते ...

बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने सर्व विभागांच्या सहकार्याने राज्यव्यापी मोहीम - एम एस पुजारी.

इमेज
रायबाग: अधिवक्ता एम.एस. पुजारी म्हणाले की, बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने सर्व विभागांच्या सहकार्याने राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे.    तालुक्यातील बावन सौंदत्ती गावातील न्यू कन्नड माध्यम प्राथमिक शाळा व बाजीराव मगदुम हायस्कूल व दिग्गेवाडी गाव सरकारी हायस्कूल येथे तालुका कायदा सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालकामगार निर्मूलन अभियानाचे गुरुवारी उद्घाटन करताना ते म्हणाले की, बालकामगार निर्मूलन अभियानाचे उद्घाटन गुरूवारी तालुक्यातील बावन सौंदत्ती गावातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. 14 वर्षांखालील बालकांचे हक्क, बालकामगार प्रतिबंध कायदा जगभरात लागू असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल.  ज्येष्ठ विधिज्ञ ए.बी.पडोलकर म्हणाले की, प्रत्येक बालकाला शिक्षण व मनोरंजन मिळण्याचा अधिकार असून त्यापासून वंचित राहता कामा नये, बालमजुरी निर्मूलनासाठी प्रत्येक गावातील शाळांमध्ये जनजागृती करण्यात येत असून यासाठी सर्वांनी हातमिळवणी केली पाहिजे.  अधिवक्ता सुधीर कळ्ळे, सीआरपी एम.  एन.ताशेवाले यांची भाषणे झाली. ...

आम्रवन महाविहाराचा कायापालट करणार-आमदार मेघना बोर्डीकर यांची ग्वाही.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  ज्येष्ठ पौर्णिमे निमित्त धम्मदेसना कार्यक्रम. परभणी : दि.26 येत्या काळात आपण आम्रवन महाविहार (देवगाव फाटा) या परिसराचा विविध विकास कामांद्वारे कायापालट करु, अशी ग्वाही आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.जिंतूर तालुक्यातील देवगाव येथील आम्रवन महाविहार येथे ज्येष्ठ पोर्णिमेनिमित्त धम्म देसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पूज्य भदन्त संघरत्न, विजय वाकळे, सुमेध सुर्यवंशी, युवराज घनसावंत, रवी डासाळकर, मावली ताटे, दत्तराव नवले, प्रतीक खिल्लारे, सुमनबाई घनसावंत, रोहिदास खंदारे, अमोल वाघ, खिल्लारे सर, विशाल चव्हाण, राहुल शिंदे, रमेश चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टी  अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना बोर्डीकर म्हणाल्या, आम्रवन महाविहार या ठिकाणी आजपर्यंत न झालेल्या विविध विकास कामां ना चालना दिली जाईल. या ठिकाणी डीपी अभावी असलेला लाईटचा प्रश्‍न दूर केला जाईल. तसेच देवगाव -फाटा-जिंतूर या मुख्य रस्त्यापासून या धार्मिक स्थळी येण्यासाठी आव...

महावीर काॅलेज मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

इमेज
कोल्हापूर : (सुरेश केसरकर) श्री. आ. दे. शि. प्र. मंडळ संचलित, महावीर महाविद्यालय कोल्हापूर मधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि बी.एम.रोटे कनिष्ठ विभागामार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. भरत नाईक हे होते. लोक राजा राजश्री शाहू महाराज जीवन आणि कार्य या विषयावर डॉ. शरद गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. अंकुश बनसोडे यांनी केले. आभार श्री. सचिन बराटे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रदीप गायकवाड यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी डॉ. राजेंद्र हिरकुडे, डॉ. महादेव शिंदे, प्रा. जयवंत दळवी, ले. उमेश वांगदरे, आदी प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली : खास.अण्णासाहेब जोल्ले.

इमेज
रायबाग : लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोपवलेली जबाबदारी चोख व प्रामाणिकपणे पार पाडली, असे प्रतिपादन चिक्कोडीचे माजी लोकसभा खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले.     भाजप रायबाग मंडळातर्फे सोमवारी आदर्श शैक्षणिक संस्था सभा भवन येथे आयोजित आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, निवडणुकीत जिंकणे आणि हरणे ही सामान्य गोष्ट आहे.  हा पराभव आपल्यासाठी विजयाची आणि ताकदीची पायरी ठरली पाहिजे.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे पराभव स्वीकारण्याची वृत्ती आणि हिंमत असेल तर पुढच्या विजयासाठी तुम्ही नवीन मार्ग शोधू शकता.  लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.  आगामी स्थानिक निवडणुकांसाठी आतापासूनच सज्ज व्हा.  पक्ष सदैव तुमच्या पाठीशी असेल, असे ते म्हणाले.   यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश आप्पाजीगोला, ग्रा.पं.  माजी सदस्य महेश भाटे, वकील एल.बी.चौगला यांची भाषणे झाली.   अध्यक्षस्थानी रायबागचे आमदार डी.एम.एहोळे होते.    रायबाग मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाधव, सुरेश बेलाडा, अनिल ह...

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला एकाच ग्रामपंचायत मध्ये आठ वर्षे कामकाज करणाऱ्या ग्रामसेवकांचा खो : वसंतराव देसाई यांचा आरोप

इमेज
जयसिंगपूर प्रतिनिधी - बहुजन ग्रामविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्याच गावसभेत देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने पत्र देऊन सुद्धा ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे स्थानिक प्रशासन स्थळावर कार्यवाही होत नसल्यामुळे गाभाऱ्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा मंजूर निधी मिळणार नाही. त्यामुळे मंदिराचे काम कित्येक वर्षापासून रखडले आहे. रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी स्थानिक प्रशासन स्तरावर कागदपत्रांची पूर्तता करून प्रयत्न करावेत अन्यथा ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराविरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याची माहिती बहुजन ग्रामविकास आघाडीचे नेते माजी सरपंच वसंतराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, सन २००७ साली सरपंच म्हणून मी कारभार स्वीकारला. २००८ मध्ये जुने हनुमान मंदिर पाडून जागा खरेदीसाठी  ७ लाख रुपये स्वतः कडील खर्च केले. माझ्या सरपंच पदाच्या काळात मंदिराचे काम ११ लाख रुपये स्वतःच्या खर्चून कळसापर्यंत नेण्याचे काम केले. तसेच हनुमान मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून दिला.  त्यानंतर सत्तांतर झा...

सेलूत भाजपाच्या वतिने जिंतूर येथील घटनेचा निषेध.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधि परभणी. दोषींवर कठोर कारवाहीची मागणी. सेलू : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विषयी इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट केल्यामुळे जिंतूर येथील एका जणावर गुन्हा दाखल करून त्याला पाठबळ देणा-या नेत्यावर कठोर कारवाहीची मागणी भाजपाच्यावतिने सोमवार २४ रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  मागील काही दिवसांपासुन मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्यावरून आरोप प्रतीआरोपाचे सत्र सुरू आहे परिणामी याची धग गावखेड्या पर्यंत पोहचली आहे.जिंतूर तालूक्यातील अल्पवयीन मुलाने भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बदल इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट केली.सदरिल मूलासह त्याला पाठबळ देणा-या नेत्यावर कठोर कारवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्यावतिने करण्यात आली आहे.यासाठी भागवत दळवे,अँड.दत्तराव कदम,अशोक अंभोरे, गणेश काटकर, अँड. रामेश्वर शेवाळे,संदिप बोकन,बाळू काजळे, अजय डासाळकर,राजू सोळंके,नामदेव झिंबरे दिलीप मगर,एकनाथ सारूक,अभय महाजन,प्रकाश शेरे, महेश नावाडे,सूदाम रोकडे,प्रल्हाद गोरे आदींनी पूढाकार...

अग्निवीर गोरखा कमांडो चे सेलू येथे स्वागत.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी गावचे सुपुत्र मारोती दिगांबर गांजकर याचे सिमला येथे अग्निविर गोरखा कमांडो गटातून भारतीय सैन्यात यशस्वीरीत्या प्रशिक्षण पुर्ण होऊन सेलू येथे आगमन झाले असता सुवाध्य मिरवणूक काढून सेलू येथे व डिग्रसवाडी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी जयसिंग शेळके, बाळकृष्ण लेवडे, संतोष निर्वळ, पांडुरंग कदम, डिगांबर गांजकर, शुभम जाधव,गोविंद निर्वळ, संभाजी होगे,कृष्णा गांजकर, रामेश्वर गांजकर, रावसाहेब गांजकर, सुहास आठवले, दर्शन आठवले, धुराजी आठवले, भरत शेरे, संतोष होगे व गावकरी उपस्थित होते.

गुरुजनांनी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन मुलांना मार्गदर्शन करावे- गणेशजी शिंदे.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित गूणवंत विध्यार्थी यांचा सत्कार सभारंभ सोहळा संपन्न. सेलू : सेलू शहरातील दिपस्तंभ प्रतिष्ठान  आयोजीत गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ शालांत प्रमाणपत्र परीक्षा उच्च माध्यमिक NEET,JEE, शिष्यवृत्ती परीक्षा संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. गूणवंत विध्यार्थी सत्कार संभारभ  आज सकाळी ११ वाजता साई नाट्यगृहात प्रमूख अतिथी व हजारो विध्यार्थी यांच्या  उपस्थीतीत  सोहळ्यात  प्रमूख पाहूणे बोलतांना गणेश शिंदे ( कवी ) यांनी या वेळी पास व नापास झालेल्या विध्यार्थी करीता एक वाक्यात आयूष्य कसे जगावे तर ते आयूष्यात कधी एखाद्या विषयात मार्क कमी पडले म्हणजे आयूष्यात तीच चूक आयूष्य घडवत नसते. ज्यात आपण हूशार आहात तेच करा आपल्याला आयूष्यात यश नक्की मिळेल. तसेच आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी शिक्षण क्षेत्रासोबत नाट्य व कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचेही कौतुक केले ...

नाईट कॉलेजच्या खेळाडूंचे राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत नेत्रदीपक यश .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी )  :  देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ अँड कॉमर्स, इचलकरंजी मधील खेळाडू अभय शिवानंद कुचेकर बी. ए. भाग दोन व कुमार रवींद्र मिठारी बी. ए. भाग तीन यांनी पंजाबी विद्यापीठ, चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीय अंतर्विद्यापीठ ड्रॅगन बोट स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करीत रौप्य पदक प्राप्त केले.         सदर स्पर्धा पंजाबी विद्यापीठ चंदिगड येथे संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील 104 विद्यापीठांच्या संघानी सहभाग घेतलेला होता. यामध्ये शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करत दोन्ही खेळाडूंनी हे यश संपादित केले.          अखिल भारतीय अंतर्विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेत दोन्ही खेळाडूंना मिळालेल्या यशाबद्दल इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन श्री राहुल खंजिरे, प्राचार्य डॉ. पी. डी. नारे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

व्हाट्सअप मेसेजमुळे सापडल्या दोन महिन्यापासून हरवलेल्या आज्जी

इमेज
प्रतिनिधी:रियाज जैनापुरे सोलापूर येथील जलकन्या भक्ती मधुकर जाधव यांनी एका व्हाट्सअँप मेसेज आधारे हरवलेल्या एका आज्जीना त्यांच्या नातलगापर्यंत पोहचवले आहे.सोलापूर शहर जवळील बाळे भागातील विनय क्लिनिक परिसरात गेले ७२ तासापासून एक आज्जी निपचित बसून आहेत असा मेसेज मुंबई ग्रुपवरून सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या लोकांना दिसला.त्यात मेसेज पाठवणाऱ्याचे नाव,पत्ता,नंबर काहीही नव्हते.फक्त सोलापूर नाव वाचून आटपाडीहून संतोष सूर्यवंशी यांनी भक्तीताईना फोन करून शोध घेण्यास विनंती केली.तो ब्लँक मेसेज भक्तीताईंनी सोलापूरशी निगडीत अनेक ग्रुपवर प्रसारित करून मेसेज लिहिणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.संभाजी ब्रिगेडचे श्रेयस माने यांच्यातर्फे मेसेज लिहिणारे बाळे भागातील दीपक करकी यांचा शोध लागला आणि आज्जी त्यांच्याजवळ असल्याचे कळले.यातूनच आटपाडी पोलीस ठाणेत मिसिंग केस दाखल झाल्याचे भक्तीताईंना कळले.त्यानुसार हालचाली करून,पूर्ण माहिती घेऊन खरसुंडी ता.आटपाडी जि.सांगली येथून या आज्जीच्या नातवाला सोलापूरला बोलावून घेऊन त्यांची कागदोपत्री ओळख पटवून,आज्जीशी सविस्तर बोलून समजूत काढून,आटपाडी पोलीस ठाणे...

देसाई यांच्या बैलाचा शनिवारी ब्लॅक मून करी स्पर्धेत विजय

इमेज
रायबाग: देसाई यांच्या बैलाने शनिवारी शहरातील ब्लॅक मून करी स्पर्धेत विजय मिळवला.  बैल धावताना, शिट्ट्या वाजवत आणि ओरडत असल्याचे पाहून उपस्थितांनी जल्लोष केला.

कामक्रोधा लोभ मदा आणि मत्सरा मोहा यांसारख्या अरिषा अद्वर्गांच्या अति मोहाने मोक्ष मिळत नाही : विशुद्ध सागर मुनी महाराज

इमेज
रायबाग;   श्री विशुद्ध सागर मुनी महाराज म्हणाले की, कामक्रोधा लोभ मदा आणि मत्सरा मोहा यांसारख्या अरिषा अद्वर्गांच्या अति मोहाने मोक्ष मिळू शकत नाही.  तालुक्यातील बावन सौंदत्ती गावात दाखल झालेल्या २६ जैन ऋषींचे गावाच्या शिवारातून मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले.. आचार्यश्री १०८ विशुद्ध सागर महाराज यांनी गावातील १००८ पार्श्वनाथ दिगंबरा जैन बसडीत मानवतेच्या चादरीच्या माध्यमातून आशीर्वाद दिला.  माणसाने चांगुलपणाला अधिक महत्त्व दिले पाहिजे आणि प्रत्येकजण आपला आहे असे वाटले पाहिजे.  जे पुण्यवान आहेत त्यांना परमेश्वर आशीर्वाद देतो.  पालकांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे.   सुशिक्षित तरुणांनीच चांगला समाज घडवता येतो.  म्हणाले.     आशीर्वाद कार्यक्रमानंतर औपचारिक भोजन (चौका) कार्यक्रम झाला.  सायंकाळी सर्व ऋषींना मांजरी गावात निरोप देण्यात आला.   श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबरा जैन बसादी आणि श्री 1008 तामणी पार्श्वनाथ दिगंबरा जैन कट्टिस बसती येथील सर्व जैन श्रावक श्रावक उपस्थित होते.

सरकार प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्यावतीने आंबेवाडी ग्रामपंचायत यांना निवेदन

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे आज दिनांक 22 जून 2024 रोजी सरकार प्रतिष्ठान च्या  वतीने मराठी शाळेतील घटती संख्या लक्षात घेता त्यावर चिंता व्यक्त करत आज ग्रामपंचायत आंबेवाडी व विद्यामंदिर आंबेवाडी येथे निवेदन देण्यात आले यावेळी गावातील नेते एम.जी.पाटील व मा. उपसरपंच मा.सचिन कोनवडेकर यांनी शाळा पुन्हा नव्याने डिजीटल स्वरुपात उभारु असे आश्वासन दिले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, गावातील पालक तसेच सरकार प्रतिष्ठान अध्यक्षा मा.भक्ती हेगडे,जिल्हा सद्स्या हेमा भाले, जिल्हा सदस्य मा.ऋतिक साठे, राधानगरी तालुका अध्यक्ष मा. अमर शेळके (सरकार),करवीर तालुका अध्यक्ष मा.जितेंद्र कुंभार व समीर जमादार उपस्थित होते.

रायबाग शहरात पारंपारिक पूजा करून वटसावित्री व्रत भक्तीभावाने साजरी

इमेज
रायबाग: शहरातील महिलांनी शुक्रवारी वटवृक्षाला (वटवृक्ष) दोरा गुंडाळून आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करून पारंपारिक पूजा करून वटसावित्री व्रत भक्तीभावाने साजरे केले.      माधुरी पुरमवारा, तपस्या मोरलवारा, स्वाती घोरपडे, मानसी कुलकर्णी, शकुंतला मोरलवारा, पूजा भाकारा, आरती शाराबिद्रे आणि इतर अनेकजण तिथे होते.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे सरकार विरोधात चिखल फेक आंदोलन

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी रियाज जैनापुरे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्रच्या प्रतिमेला काळीमा फसण्याचे काम हे महाराष्ट्र सरकारने केले आहे आरक्षणाचे वाद निर्माण करून जाती-जा जातीत भांडणे लावणे राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले सरकारी नोकरी भरती केली जात नाही कांदा कापूस सोयाबीन शेतीमालाला भाव नाही पोलीस भरती चिखलात सुरू आहे यामुळे उमेदवारांचे मोठ्या नुकसान होत आहे या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षातर्फे चिखल फेक आंदोलन करण्यात आले.यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण युवक काँग्रेस जिल्हा शहर अध्यक्ष उदय पोवार,संजय वाईकर रणजीत पोवार,किशोर खानविलकर,संपत पाटील, रियाज सय्यद, सुशांत विभुते, प्रथमेश कांबळे, मयूर पाटील, रोहन शाळ,गिरीश शिंदे,संग्राम पाटील आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे श्री चा मानकरी विशाल गावडे ठरला

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निम्मित आजरा तालुका शिवसेना युवसेना व कोल्हापूर जिल्हा अमुयचेर बॉडी बिल्डिंग असोसिएशन च्या वतीने जिल्हा स्तरीय व आजरा, चंदगड व गडहिंग्लज विभाग बॉडी बिल्डिंग स्पर्धा दूरदुडेश्वर हॉल आजरा  येथे संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे यांच्या हस्ते व बॉडी बिल्डिंग असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील,तालुका प्रमुख युवराज पोवार,प्रभाकर कोरवी, संजय धुरे,ओमकार मद्यालकर, मोसीन पटेकरी,कृष्णा पाटील, महेशपाटील,राजकुमार भोगण, हरिषचन्द्र व्हरकट,सलीम लतीफ उपस्थित होते या स्पर्धेचे मानकरी आदित्य ठाकरे श्री 2024 चे विशाल गावडे ठरले  विभागीय मानकरी प्रशांत केबळे व गटातील विजेते धीरज साळोखे,संकेत दादाघोळ, अनिकेत मंडलिक,गौतम कुचुकेरी,अभिषेक सोनूले, विष्णू नायर हे ठरले तर पंच म्हणून गणेश सकट,सिकंदर सोनूले,राजू कवाळे,भारत श्री नारायण माजगावकर ,...

मनुष्याच्या दैनंदिन जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक - गुणवंत मिसलवाड

इमेज
नांदेड- आजच्या या धकाधकीच्या जीवनाच्या आधुनिक काळात मनुष्य पैशाच्या मागे धावत असून स्वतःच्या शरीराकडे माणूस दुर्लक्ष करीत आहे, म्हणून स्वतःच्या व इतरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलीत ठेवण्यासाठी योगा हा आवश्यक आहे असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपा) नांदेड आगार येथे दि. २१ जून २०२४ शुक्रवार रोजी १० वा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले की, योग दिनाचे ध्येय व उद्दिष्टे बघितले तर सर्व जनतेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे आणि जीवन योगमय करणे हेच या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट असून समाजातील सर्व स्थरापर्यंत योगाचा प्रचार आणि प्रसार करणे आणि त्याचे फायदे जाणून घेणे ही काळाची गरज बनली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी बसस्थानक प्रमुख मा.श्री. यासीन हमीद खान यांनी योगाविषयी आपले विचार मांडले व कामगार- कर्मचाऱ्यांना योग...

श्रीराम प्रतिष्ठान येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान व आर्ट ऑफ लिविंग सेलू यांच्या संयूक्त विद्यमाने  दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस (ता.21) वार शुक्रवार रोजी एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सी.बी.एस.ई स्कूलच्या क्रीडांगणावर पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी रोडगे, प्रमुख पाहुणे आर्ट ऑफ लिव्हीगचे  योग प्रशिक्षक कैलास कदम, किशोर घडे, हरीश चेचेडिया,रुचिका गुप्ता,संस्थेच्या सचिव डॉ. सौ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, सौ. प्रगती क्षीरसागर, मुख्याध्यापिका सौ.शालिनी शेळके, प्राचार्या डॉ. मीनाक्षी रत्नपारखी, प्रा.अशोक बोडखे, कैलाश ताठे, हरीश कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतांना डॉ. संजय रोडगे म्हणाले, यावर्षी स्वतःसाठी व समाजा साठी  योग ही योगा दिन थीम आहे.योग अंगीकारल्यास जीवनातील दैनंदिन प्रश्नांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी मनोबल प्राप्त होते. आरोग्य, मन:शांती, व्यक्तिमत्त्व विकास, नैतिकता अशा सर्वांगीण उन्नतीस...

मौनेश्वर मंदिराच्या जर्नोधारासाठी श्री क्षेत्र धर्मस्थळ यांचेकडून मंदीर समितीला दिड लाख देणगी

इमेज
रायबाग : श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास योजनेचे चिक्कोडी जिल्हा संचालक विठ्ठल सलियाना यांच्या हस्ते गुरुवारी मंदिर समितीला 1 लाख 50 हजार डीडीचे वाटप करण्यात आले.   यावेळी तालुका नियोजन अधिकारी सचिन कुमार, विभागीय पर्यवेक्षक गणेश बनप्पानावर, मंदिर समितीच्या उपाध्यक्षा मौनेशा बडिगेरा, इराप्पा बडिगेरा, सिद्धप्पा अरबी, विवेक मारापुरा, अभिषेक पट्टारा, बचत संस्थांचे सदस्य, सेवा प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

राज्य काँग्रेस सरकारच्या जनविरोधी धोरणाचा रायबाग तालका भाजप पक्षाच्या वतीने निषेध

इमेज
रायबाग : राज्य काँग्रेस सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध करत भाजप पक्षाच्या रायबाग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी शहरातील झेंडाकट्टेजवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करून ग्रेड २चे तहसीलदार परमानंद मंगसुळी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन दिले.  ज्येष्ठ वकील एल.बी. चौगला म्हणाले की, राज्य काँग्रेस सरकारने सीईटी विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क, पेट्रोल, डिझेल, मुद्रांक शुल्क, वीज आणि बसचे भाडे वाढवले ​​असून त्यामुळे गरीब, शेतकरी आणि जनतेला मोठा त्रास होत आहे.  गेल्या एक वर्षापासून कोणताही विकास न करता भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या या सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे राज्य हादरले आहे, असा आरोप त्यांनी केला.   सरकारने पेट्रोल, डिझेल, बस आणि विजेचे दर कमी न केल्यास येत्या काळात राज्यभर तीव्र लढा उभारू, असा इशारा त्यांनी दिला.   रायबागा मंडलाचे अध्यक्ष पृथ्वीराजा जाधव, सदानंद हलिंगू, राजशेखर खनाळ, मनोजकुमारा मनोगली, दुंडाप्पा भेंडावडे, महेश करमाडी, अनिला हंजे, बोला कडाळ, महालिंग हंजी, सिद्धू खिंडी, बसू नाईक, विजया अकाले, महादेव नाईक, महादेव नाईक, महादेव कां...

रायबाग शहरातून तालुक्यातील जलालपूर गावापर्यंत दररोज 5 वेळा बस सोडण्याची मागणी.

इमेज
रायबाग : रायबाग शहरातून तालुक्यातील जलालपूर गावापर्यंत दररोज 5 वेळा बस चालवावी, या मागणीचे निवेदन जलालपूर गावातील नेत्यांनी गुरुवारी परिवहन व्यवस्थापक जी.आय.बसवंतपुरा यांना दिले.       रायबाग येथून जलालपूर गावात दररोज फक्त 3 वेळा बसेस येत असल्याने गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.  बस दररोज 5 वेळा चालविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.      आधीच गावात येणाऱ्या बस गावातील बसस्थानकात येत नसून गावातील मुख्य रस्त्यापर्यंतच परत येत असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.  गावात बसेसची संख्या वाढवून गावातील मुख्य बसस्थानकापर्यंत वाहतूक उपलब्ध करून देण्याची विनंती केली.     गावचे ज्येष्ठ नेते सदाशिव जगदाळे, गाव.  पं.  सदस्य नामदेव कांबळे, पांडुरंगा हवालदार, नारायण माने, आनंद चौगुला, बाळू दसर आदी उपस्थित होते.

प्राथमिक विद्यामंदिर, बहीरेवाडी शाळेस संगणक प्रधान उत्साहात संपन्न डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन चे ट्रस्टी व माजी सैनिक यांचे सुपुत्र संदीप चोथे यांचा स्तुत उपक्रमाचा आदर्श इतरानीही घ्यावा.

इमेज
बहिरेवाडी  ता. आजरा - प्राथमिक विद्यामंदिर,बहिरेवाडी  शाळेस  4 संगणक संच  प्रदान करण्यात आले.माजी सैनिक विष्णू चोथे  बहिरेवाडी यांचे  सुपुत्र असिस्टंट मॅनेजर सेनिकॉर्न टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेड, पुणे व डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन ट्रस्टी संदीप चोथे व डॉ. प्रियांका  चोथे  व चोथे परिवार यांच्या वतीने प्राथमिक विद्यामंदिर, बहिरेवाडी  जिल्हा परिषद  शाळासे भेट देण्यात आले . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन गडहिंग्लज तालुकाध्यक्ष कुमार पाटील व सचिव रामकृष्ण शेंडे, लोककला महोत्सवाचे प्रमुख  गणपती नागरपोळे सर,डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर चे अध्यक्ष  डॉ. सचिन  पोवार, शाळा व्यवस्थापन कमिटी चे  अध्यक्ष  अरविद मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत  व ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच रत्नजा सावंत  यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.                   ...

सेलू शहरात स्वराज्य गाथा शिवरायांचे या संगीतमय महानाट्याचे आयोजन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त सेलू शहरांमध्ये स्थानिक कलाकारांना घेऊन परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठे संगीतमय महानाट्याचे आयोजन सेलू जिंतूर विधान सभेचे आमदार सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांनी केले होते.आदिलशाही, कुतुबशाही,निजामशाही,मुघलाचाही या राजवटीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे लोककल्याणकारी राज्य कसे असावे हे सर्व जगाला दाखवून दिले आई-वडिलांचे स्वराज्याचे स्वप्न यातून शिवजन्म ते राज्या भिषेक सोहळा असे कर्तुत्व व प्रेरणादायी पराक्रमाची शौर्य गाथांना उजळा देणारी स्वराज्य (गाथा शिवरायांची) या संगीतमय महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले.दिग्दर्शक अमर ठाकूर सह दिग्दर्शक सतीश आकात,प्रफुल्ल वैद्य व त्यांच्या संघा तील 100 हून अधिक स्थानिक कलाकारांना रंगमंच उभा करून देण्यासाठी आमदार सौ मेघनाथ बोर्डीकर यांनी या महानाट्याचे आयोजन केले.तसेच  या कार्यक्रमाचे आयोजन 06 जून रोजी करण्यात आले होते, परंतु पावसामुळे या कार्यक्रमात अडथळा आला होता. त्यानंतर या कार्यक्रमाचे दिनांक 16 जून रोजी ...

रायबाग : ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद सणानिमित्त सामूहिक नमाज अदा

इमेज
रायबाग: सोमवारी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजाच्या सदस्यांनी बकरी ईद या कुर्बानीच्या सणानिमित्त सामूहिक नमाज अदा केली.  त्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 

सेलू तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  खेर्डा येथे विज पडून तीन शेळ्या दगावल्या. शेतकऱ्याच्या आखाड्यावरील पत्रे उडून गेली. सेलू : सेलू तालुक्या तील खेर्डा या गावी रात्री झालेल्या पावसाने शेतातील आखाड्यावर वीज पडून तीन शेळ्या जागीच मरण पावल्या व आखाड्यावरील घराचे वरील पत्रे उडून गेल्याने शेतकरी अमोल बालासाहेब काळे यांचे नुकसान झाले दिनांक 16 जून रविवार रोजी रात्री झालेल्या पावसात सेलू तालुक्यातील खेरडा येथील गट नंबर 142 अमोल बालासाहेब काळे यांच्या शेतात रविवार रात्री साडेनऊ ते दहा च्या दरम्यान जोरदार पावसामुळे घरावर वीज कोसळून तीन शेळ्या दगावल्या व घरावरील पत्रे उडून गेली यामध्ये शेतकऱ्याची घरामधील असणारे साहित्य बी बियाणे खत तसेच संसार उपयोगी साहित्य पावसाने भिजले जनावरांच्या अंगावर पत्रे पडल्यामुळे काही जनावरे जखमी झाली पंधरा ते वीस शेळ्या पैकी तीन शेळ्या दगावल्या यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले.

माजी ग्राम पंचायत अध्यक्षांच्या पतीचा खून

इमेज
वार्ताहर एकसंबा  एकसंबा येथील माजी ग्राम पंचायत अध्यक्षांच्या पतीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी 17 रोजी सकाळी बिरेश्वर नगरात उघडकीस आली. महांतेश श्रीमंत कुरणी (वय 48) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदलगा पोलिस ठाण्यातर्फे पंचनामा करण्यात आला असून सदर प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.        या घटनेविषयी अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी बिरेश्वर नगर येथे राहणाऱ्या व्यक्तींना एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याचे आढळून आले. सदर माहिती गावातील पुढाऱ्यांमार्फत सदलगा पोलिसांना कळविण्यात आली. सकाळी घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन स्थानिकांची विच्यारापूस केली. दरम्यान रविवारी रात्री यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रम पाहून रात्री 2 च्या सुमारास अनेकजण घरी परतले त्यावेळी त्या ठिकाणी काहीच नव्हते असे स्थानिकांनी सांगितले. यामुळे सदर घटना पहाटे घडली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.        सदलग्याचे फौजदार बिरादार, सीपीआय , एसपी व सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. य...

मराठी चित्रपट खाकी ...लय भारी मध्ये अभिनेता राजू वावधने रुपेरी पडद्यावर झळकणार...

इमेज
शेवगाव पांडुरंग गोरे - नागेश फिल्म प्रोडक्शन व आई जगदंबा भवानी फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खाकी ...लय भारी या मराठी चित्रपट मध्ये राजू वावधने   पोलीस कॉन्स्टेबल च्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे, अभिनेता राजू वावधने यांनी कोवीड च्या काळामध्ये  जनजागृती , समाजकार्य केले आहे, यांची दखल घेत, निवडीचे पत्र दिग्दर्शक पांडुरंग गोरे, कास्टिंग डायरेक्टर श्री उद्धव फंगाळ सर, यांनी त्यांना नुकतेच दिले आहे,   अभिनेता राजू वावधने यांनी आपल्या नावाशी संदर्भ राखणारा सच्चा प्रामाणिक हवालदार ...राजू शेट्टी पोलीस कॉन्स्टेबलची दमदार भूमिका, खाकी ..लय भारी या मराठी चित्रपटातील भूमिका देश भक्ती ची आहे,   देशभक्ती वरती चित्रपट असल्यामुळे त्यांनी हा चित्रपट स्वीकारला नसून,  दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचे चित्रपटाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात दाखल होणार आहे, व देशाच्या गद्दारांना ठोकल्याशिवाय राहणार नाही , हि शपथ घेणार आहे, यासाठी आता अभिनेता राजू वावधने हे जीवाची परवा न करता जीवाची बाजी लावू , पुर्व परिश्रम घेऊन चित्रपट करू त्यांचे या भूमि...

मराठी चित्रपट खाकी... लय भारी मध्ये प्रचिती चांदणे यांची सुपर जबरदस्त एंट्री...

इमेज
शेवगाव पांडुरंग गोरे प्रतिनिधी- सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीद घेऊन खाकी.. जन्मला आलेली आहे,  देश भक्ती वर आधारित खाकी...लय भारी , म्हणजेच देशाच्या दुश्मनासाठी लय डेंजर ..या मराठी चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रचिती चांदणे यांची या मराठी चित्रपटांमध्ये जबरदस्त सुपर डुपर... एक झलक सबसे अलग...एंट्री होणार आहे ,  रुपाली ठाकूर हि मध्यवर्ती भूमिका करणार आहे ,या चित्रपटाची निर्माते दिग्दर्शक पांडुरंग गोरे व कास्टिंग डायरेक्टर श्री उद्धव फंगाळ सर  यांनी त्यांची निवड केली आहे , अभिनेत्री प्राचीती चांदणे यांची एक झलक पाहयासाठी प्रेक्षक खाकी मराठी चित्रपट ची वाट पाहत आहे, खाकी मध्ये रूपाली ठाकूर या भूमिकेत दिसणार आहे, सिने अभिनेत्री प्रतीक्षा चांदणे यांना  आता पर्यंत विविध चित्रपटांमध्ये भूमिका केले असून त्यांच्याकडज नेहमी छोटी , मोठे भूमिके चालून येत आसते , तसेच दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्या बहुचर्चित खाकी ...लय भारी या मराठी चित्रपटासाठी त्यांना भुमिके साठी विचारणा केली असता त्यांनी दिग्दर्शक यांना त्वरित होकार दिला आहे, या संधीचा आपण नक्कीच सोनं करून व जबरदस्त चित्...

नंदीकुरळी गावच्या तलावाला कालव्याद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे अभिनंदन

इमेज
रायबाग : तालुक्यातील नंदीकुरळी गावच्या तलावाला कालव्याद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि या भागातील जनतेला लाभ दिल्याबद्दल जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे अभिनंदन करतो, असे केपीसीसीचे सरचिटणीस महावीर मोहिते यांनी ग्रामस्थांच्या वतीने सांगितले.   तालुक्यातील नंदीकुरळी गावच्या तलावाला रविवारी उद्यानाचे लोकार्पण केल्यानंतर बोलताना ते म्हणाले की, बायपास कालव्याच्या बांधकामानंतर या गावातील जनतेचे खूप हाल होत आहेत.  हे लक्षात येताच पाटबंधारे विभागामार्फत या तलावात पाणी सोडण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.  मंत्र्यांचे निकटवर्तीय काँग्रेस नेते शिवू पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील 39 तलाव भरण्याची योजना सरकार लवकरच राबवणार आहे.  यामुळे आगामी काळात पाण्याच्या समस्येतून सुटका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.    सुनिला जाधव, बहुसाहेबा पाटील, सिद्धरुद्ध बंडगरा, हाजी मुल्ला, नामदेव कांबळे, वसंत करीगरा, महादेवा नाईक, किरण कांबळे, मुजीद सय्यद, संतोष सावंत, सतीश मगदुमा, सुरेश कांबळे, अजिता उमराणी, दत्ता मोरे, यमनाप्पा माळी, श्रवण ...

तायक्वांदो केंद्राचे खेळाडू शिवप्रसाद दिवटे व रोहना राठोडा यांनी सुवर्णपदक पटकावून तालुक्याचे नाव लौकिक

इमेज
रायबाग : सहारनपूर, उत्तर प्रदेश येथे झालेल्या ६ व्या राष्ट्रीय पॅरा तायक्वांदो स्पर्धेत रायबाग तायक्वांदो केंद्राचे खेळाडू शिवप्रसाद दिवटे व रोहना राठोडा यांनी सुवर्णपदक पटकावून तालुक्याचे नाव लौकिक केले आहे.  या खेळाडूंना जयदीप देसाई यांनी प्रशिक्षण दिले. 

अभिनेता अनिल गव्हाणे यांची खाकी... लय भारी मराठी चित्रपट मध्ये झळकणार...

इमेज
कवि सरकार इंगळी  शेवगाव पांडुरंग गोरे - प्रतिनिधी  खाकी ...लय भारी अहमदनगर जिल्ह्यातील काळया मातीतला रांगडा सिनेमा याकडे पाहिले जात आहे, अहमदनगर जिल्ह्यातील नागेश प्रोडक्शन व आई जगदंबा भवानी मूव्ही प्रोडक्शन निर्मित यांच्या संयुक्त विद्यमानाने , दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा बहुचर्चित आगामी मराठी चित्रपट देशभक्तीवर आधारित खाकी... लय भारी म्हणजे देशाच्या दुष्शमनासाठी लय डेंजर... या मराठी चित्रपटांमध्ये  अभिनेता अनिल गव्हाणे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली व आहे व त्यांना या चित्रपटांमध्ये पोलीस कमिशनर चा मुख्य रोल देण्यात आला आहे व ही भूमिका त्यांना देण्यात आली आहे,    अभिनेता अनिलजी गव्हाणे यांची मराठी फिल्म इंडस्ट्री मधून अभिनंदन होत आहे,  त्यांनी दिग्दर्शक पांडुरंग गोरे , कास्टिंग डायरेक्टर श्री उद्धव फंगाळ सर,  सिने अभिनेता रामदास राऊत यांचे आभार मानले आहे व धन्यवाद दिले आहे , या चित्रपटांमध्ये एकूण 42 कलाकारांना यामध्ये भूमिका देण्यात आली आहे, हा चित्रपट डिसेंबर अखेर  ख्रिसमीस  नाताळ या महत्वपूर्ण सणाच्या दिवशी संपूर्ण महारा...

बोधेगाव चे पंकज कांबळे खाकी... लय भारी मराठी चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर

इमेज
शेवगाव पांडुरंग गोरे - सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही ब्रीद घेऊन खाकी जन्माला येते....खाकी ...लय भारी हा मराठी चित्रपट देशभक्ती वरती आधारित आहे, बोधेगाव येथील पंकज कांबळे यांची चित्रपट साठी निवड करण्यात आली आहे , खाकी लय भारी चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे   पोलिसांची टीम मध्ये पंकज कांबळे हे  आतंकवादी करणाऱ्या... देशाच्या गद्दारांना ठोकण्यासाठी सज्ज झाले आहे , तावडे यांची भूमिका बोधेगाव येथी पंकज कांबळे हे करणार आहे, या चित्रपटांमध्ये पावरफुल डायलॉग देशाच्या सीमेवरती तैनात असलेले सैनिक व शहरात गावामध्ये रक्षक असलेले पोलीस दल या मध्ये आतंकवादांचा संघर्ष हा खुबीने दाखवला आहे , प्रथमचं रुपेरी पडद्यावर पांडुरंग गोरे, अभिनेत्री प्रतीक्षा कुलथे यांची झकास एट्री होणार आहे ,यामध्ये  मराठीसह  हिंदी मध्ये बॉलीवूड स्टार चित्रा दीक्षित व प्रतिज्ञा चांदणे ऋतुजा पाटील चित्रपट मध्ये आहे  पोलिसांचे टीमचे आतंकवादी सोबत चकमक आणि संघर्ष दाखवला आहे , पोलीस कसे जीवावर उदार होऊन कामगिरी फत्ते करतात... या चित्रपटामध्ये धारदार संवाद व अंगावर काटा येणारे ॲक्शन आहे,...

भावपूर्ण श्रध्दांजली कै. नायकू भाऊ माने यांच्या १२ व्या स्मृति दिनानिमित्त विनंम्र अभिवादन...

इमेज
भावपूर्ण श्रध्दांजली कै. नायकू भाऊ माने यांच्या १२ व्या स्मृति दिनानिमित्त विनंम्र अभिवादन...! भोसले, पाटील, माने परिवार (मलिकवाड, ता.चिक्कोडी, जि. बेळगाव.)

मिरजेतील जिजामाता शाळेत निसर्ग प्रेमी ग्रुप तर्फेशैक्षणिक साहित्याचे वाटप

इमेज
प्रतिनिधी: रियाज जैनापुरे १५ जुन हा शालेय दिवसाचा पहिला दिवस या दिवसाचे औचित्य साधून निसर्गप्रेमी ग्रुप यांच्याकडून मिरज येथील राजमाता शाळा नंबर ४ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या साहित्याचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चिकुर्डे मॅडम यांनी या उपक्रमाबद्दल निसर्गप्रेमी ग्रुपच्या सर्व सदस्यांचे स्वागत करून आभार मानले या कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक मा. मिलिंद अग्रवाल, मा. नंदकिशोर ओझा, मा.वाय.सी. कुलकर्णी, मा. उन्मेश वसगडेकर,मा.विलास कांबळे आणि मा. जमदाडे उपस्थित होते.

बॉलीवूड अभिनेत्री.. चित्रा दीक्षित यांची खाकी... लय भारी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका...

इमेज
शेवगाव पांडुरंग गोरे - दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा देशभक्ती वरती आगामी मराठी चित्रपट खाकी ...लय भारी या मराठी चित्रपटांमध्ये बॉलीवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित यांची खाकी... लय भारी चित्रपटांमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली आहे, या निवडीचे पत्र त्यांना दिग्दर्शक पांडुरंग गोरे श्री उद्धव फंगाळ  सर यांनी दिले आहे,   रवीशा तेलधुणे यांच्यासोबत बॉलीवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित परफॉर्मन्स करणार आहेत, पोलीस कथेवर बेतलेला हा सामाजिक मराठी कौटुंबिक , कॉमेडी चित्रपट असून यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित व रविशा तेलधुणे यांच्यावरती आला... टांगमोडे हवालदार... तुझ्या जिवाचा मैतर झाला... दोन जीवाची जोडी जिवलग झाली.. हे सॉंग चित्रित होणार आहे व हे सॉंग जबरदस्त झाले आहे, या चित्रपटाची कथा स्टोरी व गाणी दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी लिहिली आहे, चित्रा दीक्षित यांचे बॉलीवूड व मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले आहे व आपल्या अभिनयाच्या जोरावरती मराठीसह हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये शिक्का मोर्तब केला आहे, आज सर्वांच्या पसंतीची नंबर वन सिने अभिने...

सेलूच्या भूमीपुत्राने पटकावले आफ्रिकेत ब्राँझपदक.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  धावण्याच्या शर्यतीत संतोष गायकवाड यांचे यश. सेलू :दि.14 सेलूचे भूमीपूत्र तसेच येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालया चे माजी विद्यार्थी आणि उपसचिव मंत्रालय (अन्न,नागरिक पुरवठा आणी ग्राहक संरक्षण) विभागात कार्यरत असलेले संतोष उमेशराव गायकवाड यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या धावण्याच्या स्पर्धेत 90 कि.मी. या प्रकारात ब्राँझ पदक मिळवून देशाचे आणि सेलू शहराचे नाव उंचावले आहे.दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन अल्टीमेट असोसिएशन यांच्या वतीने 11 जून रोजी आयोजित केलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन अल्टीमेट ह्युमन रेस या धावण्याच्या स्पर्धेत 90 किमी धावणे स्पर्धेत संतोष गायकवाड यांनी ब्राँझ पदक मिळवले. 10 तास 09 मिनिटं इतक्या वेळात त्यांनी 90 किमी अंतर पूर्ण केले. मोठ्या प्रशासकीय पदावर असतांनाही संतोष गायकवाड यांनी धावण्याच्या स्पर्धेत पदक मिळवले ही अभिमानास्पद बाब आहे. आज असंख्य माणसे विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी धावणे हा व्यायाम आवश्यक आहेच. परंतु, यासोबत जर जास्त सराव केला तर विविध स्पर्धेत भाग घेऊन नावही उंचावता येते हे गायकवाड यांनी सि...

इंगळी येथील मनाला चटका लावणारा युवा उद्योजकांचा मृत्यू...

इमेज
कवि सरकार इंगळी  हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावचे सुपुत्र, गावातील प्रगतशील शेतकरी, उत्कृष्ट प्रामाणिक उद्योजक, इंगळी गावातील सर्वच लोकांच्या बरोबर मिळून मिसळून असणारे जैन समाजातील अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्व, सातत्याने जिव्हाळा, प्रेम, इतर संकटकाळी इतरांच्या कार्याला सदैव सहकार्य लाभलेले,  श्री शरद आणासो बुगटे यांचा मृत्यू म्हणजे मनाला चटका लावणारा मृत्यू झाला अजून वयाची पन्नाशी ओलांडली नाही अशा वयात त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे .        स्वःताच्या गावात शेती सांभाळीत त्यांनी परगावी ज्वेलर्सचे व्यवसाय करत होते आपल्या गावासह शिरोळ तालुक्यातील अनेक गांवना सोने चांदी व्यवसायाच्या माध्यमातून नाव कमावले होते  नव उद्योजक म्हणून त्यांचा आदर्श घेण्यासाखा होता पण त्यांना वाटेतचं मृत्यूने गाठले . आपला व्यवसायाचे काम संपवून घरी येत असताना त्यांना मोटरसायकल चालवताना हार्ट अटॅक आलेने खाली पडलेने त्यांचा मृत्यू झाला .      शदर आणणासो बुगटे हे गावातील तरुण वर्गाला दिशा व मार्गदर्शन देणारे व्यक्तीमहत्व होते . त्यांच्या अचानक निध...

कै.पुंडलिक गनू पाटील यांना भावपुर्ण श्रद्धांजली

इमेज
प्रतिनिधी अमर माने मलिकवाड -  गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पुंडलिक पाटील आबा यांचे वृध्दापकाळाने काल रात्री निधन झाले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.हीच भावपूर्ण श्रध्दांजली. 💐💐🙏🙏🙏

खाकी ...लय भारी चित्रपटांमध्ये अभिनेता भिमसेन चव्हाण झळकणार आमदार साहेबांच्या भूमिकेत...( बोला तो... बोला हा डायलॉग करणार फेमस...)

इमेज
शेवगाव पांडुरंग गोरे-  दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा आगामी खाकी ...लय भारी हा मराठी चित्रपट लवकरचं चित्रीकरणासाठी सज्ज होत आहे व या मराठी चित्रपटांमध्ये रावसाहेब मोहिते - पाटील या आमदाराच्या कॅरेक्टरसाठी पुणे येथे दिग्गज सेलिब्रिटी सिने अभिनेता भिमसेन चव्हाण सर यांना श्री उद्धव फंगाळ सर,दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्याकडून नियुक्त करण्यात आले व त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे व या चित्रपटांमध्ये त्यांची निगेटिव्ह रोल आहे व यामध्ये ते आमदार रावसाहेब मोहिते - पाटील हे कॅरेक्टर साकारणार आहेत. ( बोला तो..बोला चूप रहने का ) हा जबरदस्त डायलॉग ते फेमस करणार आहेत. रावसाहेब मोहिते - पाटील हे आमदार कॅरेक्टर वरून देशभक्तीचा भाव  असला तरी यामध्ये त्यांची खलनायकी निगेटिव्ह शेड्स  प्रेक्षकांना पाहता येणार आहे व या चित्रपटांमध्ये ते आपली जान जीवाची बाजी लावून ही भूमिका ते निभावणार आहेत व या भूमिकेसाठी ते खूप इंटरेस्टिंग असून त्यांनी दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्याकडून संपूर्ण स्टोरी ऐकून घेतली आहे व ते या चित्रपटांमध्ये मुख्य खलनायकाच्या  तोडीस... तोड भूमिकांनी होणा...