एसटी च्या नांदेड आगारात राष्ट्रीय दहशतावद विरोधी दिन साजरा कामगार - कर्मचाऱ्यांनी घेतली सामूहिकरित्या शपथ

नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. २१ मे २०२४ मंगळवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता आगाराच्यावतीने ३२ वा राष्ट्रीय दहशतावद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक मा.श्री. अनिकेत बल्लाळ, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हारकळ, वाहतुक नियंत्रक राजकुमार कांबळे, कामगार नेते रघुनाथराव वाघमारे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख मनोहरराव माळगे, लिपीक सौ. सुनीता हुंबे, प्राजक्ता भालेराव, आशा वाघमारे, रेखा माचीनवार, शिल्पा ढवळे, कृष्णा पवार, संतोष देवकांबळे, गंगाधर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन आपले विचार मांडले. ते आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले की, दहशतवाद व हिंसाचार हा भारत देशासहीत जगातील कोणत्याही देशाला न परवडणारी बाब असून भारत देशाचे सहावे व तरुण दिवंगत माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे २१ मे १९९१ ला लिट्टेच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी मानवी बॉम्बने हत्या केली. तेंव्हापासून २१ मे हा दिवस दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतीदिन (पुण्यतिथी) स्मरणार्थ या दिवशी राष्ट्रीय दहशतावद व हिंसाचार विरोधी दिन व बालदिन म्हणून पाळला जातो, असे प्रतिपादन केले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, २१ मे हा दिवस शपथेच्या (प्रतिज्ञा) माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता वाढविणे, शांतता, सुसंवाद मानव जातीचा संदेश देण्यासाठी लोकांमध्ये पैक्य वाढविण्यासाठी सजग राहून समाजाप्रती, राष्ट्राप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.

शेवटी गुणवंत एच. मिसलवाड यांनी कामगार कर्मचाऱ्यांना सामूहिकरित्या राष्ट्रीय दहशतावद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ (प्रतिज्ञा) दिली. यावेळी आगारातील कामगार कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.