इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे - विशाल घोडके

गडहिंग्लज : (वार्ताहर)
शनिवार दि. 11/ 04/ 2024 रोजी साधना हायस्कूल, गडहिंग्लज येथे आर्किटेक्टस ॲन्ड इजिनिअर्स वेल्फेअर असोसिएशन, गडहिंग्लज यांचेवतीने इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंत कामगारांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 
यावेळी विविध कामगार कायद्यांची माहिती देत, इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रमुख वक्ते कोल्हापूरचे सहा. कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले.
प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर यांनी राज्य व केंद्र शासनाच्यावतीने समाजातील सर्व घटकांना मिळणाऱ्या योजना व उपक्रम तसेच सोयी सवलती त्याचबरोबर राज्य व केंद्र शासनाचे विविध पुरस्कार याबाबत सविस्तर माहिती दिली. यापुढील काळातही समाजातील सर्वच घटकांसाठी शासनाच्या योजनांचा व उपक्रमांचा प्रचार तसेच प्रसिद्धी, तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय मनोगतात साधना ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य जे. बी. बारदेस्कर यांनी असो.च्या कार्याचे कौतुक केले व यापुढील काळातही असेच नाविण्यपूर्ण उपक्रम आयोजित करून समाजहित जोपासावे असे सूचविले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनाने करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविकामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष अजित उत्तुरकर यांनी, असोसिएशनच्या समाजाभिमुख कार्याची माहिती देऊन, यापुढील काळातही असेच कार्यक्रम आयोजित करण्याचे सुतोवाच केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश इंगळे यांनी केले तर आभार शैलेंद्र कावणकर यांनी मानले. यावेळी कामगार सह आयुक्त मा विशाल घोडके, प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, सुरेश केसरकर, सौ. फिलोन बारदेस्कर आदी. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न होणेकामी असोसिएशनचे अध्यक्ष इंजि अजीत उत्तुरकर, उपाध्यक्ष संदीप पाटील, सचिव राजु देशमाने, खजिनदार अमीत मिसाळ, संचालक नाईक सर, अशोक रोटे, दयानंद गुरव, श्रीरंग राजाराम, कृष्णात घोरपडे, रमेश गायकवाड, दत्ताराम पाटील, शैलेंद्र कावणेकर, बाजीराव पाटील, प्रकाश इंगळे, सुयश लोखंडे आदी. संचालक, सभासद तसेच संबंधित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.