देऊळगाव गात येथे मराठा आरक्षण आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मनोज जरांगे पाटील यांनी दिली सांत्वन पर भेट.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 
 
 
सेलू : सेलू तालुक्यातील 
देऊळगाव गात येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरागे पाटील यांनी दिनांक एक मे रोजी दुपारी 3:30 दरम्यान मराठा आरक्षण मिळावे याकरिता दि. 16 एप्रिल रोजी  देऊळगाव गात येथील बाबासाहेब  गायकवाड यांनी पळसाच्या झाडाला स्वतःच्या शर्टाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानिमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या आई- वडिलांची भेट घेऊन चौकशी करून  कुटुंबाला धीर दिला. 
मराठ्यांच्या मुलांनी रडायचे नाही तर लढायचे असे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी जाता जाता  उपस्थित मंडळींना व तरुणांना मराठा आरक्षण मिळावे यासाठी रडायचे नाही तर लढायचे कोणीही आत्महत्या करू नये. आत्महत्या केल्यामुळे आई-वडिलांना काय दुःख होते त्या कुटुंबावर काय दुःख कोसळते हे सहन होणे शक्य नाही.  त्यामुळे रडायचे नाही तर लढायचे असा मोलाचा संदेश दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.