कबड्डीतून खेळाडूंना भविष्य घडविण्याची संधी : अमरसिंह पाटील बाल शिवाजी मंडळाच्यावतीने उन्हाळी कबड्डी प्रशिक्षणास सुरुवात
शिरोळ : प्रतिनिधी : गेल्या काही दिवसापासून कबड्डी खेळाला विशेष व्यासपीठ मिळाले आहे देशातील कबड्डी प्रो या स्पर्धेत ग्रामीण भागातील अनेक खेळाडू चमकत आहेत त्यामुळे कबड्डीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन या परिसरातील खेळाडूंनी आपले भविष्य घडवण्याची संधी प्राप्त करून घ्यावी असे आवाहन बाल शिवाजी मंडळाचे उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले
येथील बाल शिवाजी मंडळाच्या वतीने दहा दिवसाचे उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबिरास मंडळाचे उपाध्यक्ष अमरसिंह पाटील व अध्यक्ष रावसाहेब देसाई सचिव प्रा आण्णासाहेब माने गावडे यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली यावेळी अमरसिंह पाटील हे उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करत होते
बाल शिवाजी मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई म्हणाले की लहानपणापासूनच खेळाडूंना मैदानी खेळाची आवड असणे गरजेचे आहे भविष्यात कबड्डीतून आपले करिअर उज्वल घडेल यासाठी कबड्डी प्रशिक्षणाची गरज आहे मंडळाने आयोजित केलेल्या या प्रशिक्षण शिबिराचा सर्वांनीच लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले
मंडळाचे सचिव प्रा आण्णासाहेब माने गावडे यांनी उपस्थित खेळाळून कबड्डी खेळातील कौशल्याविषयी मार्गदर्शन करून प्रत्येकाने किमान दहा दिवस तज्ञ प्रशिक्षकांकडून कबड्डी खेळातील डावपेच शिकून घ्यावेत असे आवाहन केले
पत्रकार चंद्रकांत भाट यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला
कबड्डी प्रशिक्षक प्रा चंद्रकांत माने गावडे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले अमित संकपाळ यांनी आभार मानले यावेळी कबड्डी प्रशिक्षक शहाजान शेख संदीप चूडमुंगे नरेंद्र माने नंदू जाधव किरण माने गावडे माजी नगरसेवक विजय उर्फ दादासो कोळी एन वाय जाधव रावसाहेब पाटील मलिकवाडे पत्रकार चंद्रकांत भाट संजय माने मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू नंदू गावडे उदय आवळे बुधाजी चूडमुंगे शाहूल कोळी धैर्यशील पाटील रामजी पाटील हरीश माने अजित पाटील बाळकृष्ण माने शुभम माने कृष्णा गावडे तुषार पुजारी सौरभ इंगळे विनायक सावंत पारस भाट नरेश माने प्रमोद यादव यांच्यासह मंडळाचे आजी-माजी खेळाडू प्रशिक्षणार्थी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पण्या