उदगांव येथे तरूणांची आत्महत्या
उदगांव (ता. शिरोळ) येथील राहूल ज्ञानदेव कुंभार (वय 39 रा.महावीर कॉलनी) याने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कुंभार हा दिलीप चौगुले यांच्या घरी भाड्याने राहणेस होता. याबाबतची वर्दी रमेश कुंभार (रा.नरवाड ता.मिरज) यांनी दिली.
टिप्पण्या