केन बुद्धिबळ अकादमी इचलकरंजी आयोजित लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी, व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी सहकार्या ने बुद्धिबळ विकास उपक्रम राबविण्यात आला

इचलकरंजी: 
               रविवारी  केन चेस अकॅडमी इचलकरंजी यांच्या वतीने व्यकंटराव हायस्कूल व   लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने  शहीद भगतसिंग उद्यान व व्यकंटराव हायस्कूल येथे बुद्धिबळाचा विकास आणि प्रसार होण्यासाठी SIMULTANEOUS CHESS EXHIBITION चे आयोजन करण्यात आले ; यामध्ये केन चेस अकॅडमी इचलकरंजी चे आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू अथर्व तावरे आणि आराध्य ठाकूरदेसाई ,करण दबडे यांनी एकाच वेळी दहा -10 शालेय बुद्धिबळ खेळाडूंसोबत बुद्धिबळाचा डाव खेळला आणि तो जिंकला. 
या उपक्रमामुळे कोल्हापूर, कुरुंदवाड, इचलकरंजी येथील  बुद्धिबळ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आणि अतिशय चांगला असा अनुभव मिळाला आहे. 
या उपक्रमाचे उद्घाटन व्यकंटराव हायस्कूल शिक्षक श्री. राजेंद्र  आलोने  सर व शहीद भगतसिंग उद्यान कर्मचारी मंजुनाथ खंदारे यांच्या हस्ते झाले आणि या उपक्रमाचे आभार प्रदर्शन व्यकंटराव हायस्कूल क्रीडा शिक्षक श्री. गणेश बरगाले सर व गणेश गोरे यांनी केली;  या स्पर्धेसाठी सूत्रसंचालन आणि मार्गदर्शन केन चेस अकॅडमी इचलकरंजीचे मुख्य प्रशिक्षक श्री. रोहित पोळ आणि रेश्मा नलवडे यांनी केले.  अशा प्रकारचे  अनेक बुद्धिबळ प्रसार व विकास उपक्रम केन चेस अकॅडमी इचलकरंजी , लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि व्यकंटराव हायस्कूल यांच्या वतीने राबविण्यात येतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.