खास.धैर्यशील माने यांच्या विषेश प्रयत्नातून केलेल्या रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे रस्त्याची खडी उचकटू लागली सदर रस्ते कामाचे चौकशीची मागणी
हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी गावात खासदार धैर्यशील माने यांचे फंडातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रस्ते गटारीचे कामे सुरू आहेत. तर काही कामे पूर्ण झाली आहेत, रस्त्याचे काम नित्कृष्ठ झाल्यामुळे एक महिन्यापुर्वी पुर्ण केलेल्या काॅंक्रिट रस्त्याची खडी उचकटून रस्त्याला भेगा पडल्याने या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सुरू असलेले रस्ते, गटारीचे काम नित्कृष्ट दर्जाची केले जात आहेत याबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वार्ड नंबर 2 माने मळा परिसरातील पटेल कारखाना ते नारायण शिंदे यांच्या घरापर्यंत तीनशे फूट रस्ता एक महिन्यापूर्वी कॉंक्रिटीकरण करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम नित्कृष्ट झाले असून एका महिन्यातच काँक्रीट रस्त्याचे खडी उचकटून रस्त्यावर विखुरली आणि भेगा देखील पडल्यामुळे कामाच्या दर्जा बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त होत आहे.
काही कामे मार्च अखेर घाई गडबडीत पूर्ण करून सदर कामाची बिले देखील कॉन्ट्रॅक्टरने उचलली आहेत. मात्र पुर्ण करण्यात आलेल्या कामांच्या दर्जाचं काय ? असा प्रश्न भागातील नागरिकांमधून होत आहे.
पुर्ण झालेली अथवा चालु असलेल्या रस्ते, गटारींची कामे दर्जेदार आहेत की, नाही, याची सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी कामांचा दर्जा तपासला का? दर्जा तपासला तर एक महिन्यापूर्वी केलेला काॅंक्रिटीकरण केलेला रस्ता उखडला कसा याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल भागातील नागरिकांतून केला जात आहे. सदर रस्ते कामाची व काॅंन्ट्रक्टरची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे
टिप्पण्या