जयसिंगपूर चेस अकॅडमी वतीने चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूल जयसिंगपूर येथे बुद्धिबळ विकास उपक्रम राबविण्यात आला

जयसिंगपूर: (रोहित पोळ)
               रविवारी  चेस अकॅडमी जयसिंगपूर यांच्या वतीने आणि चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूल यांच्या सहकार्याने जयसिंगपूर येथे बुद्धिबळाचा विकास आणि प्रसार होण्यासाठी SIMULTANEOUS CHESS EXHIBITION चे आयोजन करण्यात आले; यामध्ये चेस अकॅडमी जयसिंगपूरचे आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू संस्कृती सुतार आणि सिद्धी बुबणे यांनी एकाच वेळी दहा  शालेय बुद्धिबळ खेळाडूंसोबत बुद्धिबळाचा डाव खेळला आणि तो जिंकला. 
या उपक्रमामुळे जयसिंगपूर व परिसरातील शालेय बुद्धिबळ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आणि अतिशय चांगला डाव खेळण्याचा असा अनुभव मिळाला आहे. 
या उपक्रमाचे उद्घाटन चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री. ए. आर. पाटील यांच्या हस्ते झाले आणि आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री. राहुल डिग्रजे यांनी केली;  या स्पर्धेसाठी सूत्रसंचालन आणि मार्गदर्शन चेस अकॅडमी जयसिंगपूरचे  मुख्य प्रशिक्षक श्री. रोहित पोळ आणि श्रुती कुलकर्णी यांनी केले.  अशा प्रकारचे अनेक बुद्धिबळ उपक्रम चेस अकॅडमी जयसिंगपूर वतीने चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूल जयसिंगपूर व परिसरात  राबविण्यात येतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.