सौ.इंदुमती शंकराव गाट इंग्लिश स्कूल रांगोळी चा दहावीचा निकाल 100%टक्के
रांगोळी येथील इंदुमती शंकरराव गाट हायस्कूलचे एस.एस.सी परीक्षा मार्च 2024 चा निकाल 100% लागला असून यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यशस्वी होण्याची परंपरा कायम राखली आहे.
या इंग्लिश हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक आम्रपाली दगडू कांबळे 86.80%, द्वितीय क्रमांक अभिजीत अरुण यादव 84.00% ,तृतीय क्रमांक तस्मिया बकश मुल्लाणी 82.80%,चतुर्थ क्रमांक वैष्णवी भगवान हावलदार 73.80% गुणांसह क्रमांक पटकावले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ए आर कलाजे. पी एस पाटील,टी, एफ, देसाई येस, व्ही ,प्रज्ञासागर ,सी, बी, राजोबा , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले
टिप्पण्या