सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 


परभणी : दि.06 उत्तर रेल्वे विभागाच्या कार्यक्षेत्रात विवीध जिल्ह्यातील  आंदोलनांमुळे काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांवर त्याचे परिणाम उमटले असून सातत्याने रेल्वे उशिराने धावत आहे  त्यामुळे नांदेड-अमृतसर-नांदेड या सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात सुध्दा रेल्वे विभागाने सहा दिवसांसाठी तात्पुरता बदल केला आहे.7 मे रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 127145 हुजूर साहिब नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस सकाळी 9.30 ऐवजी दुपारी 3 वाजता सुटणार आहे. तर 4 ते 9 या दरम्यान नांदेड अमृतसर एक्सप्रेस जाखल, धुरी व लुधियाना मार्गे धावणार आहे. तर अमृतसर-नांदेड एक्सप्रेस लुधियाना, धुरी व जाखल मार्गे परतीचा प्रवास करणार आहे. नांदेड ते जम्मुतावी एक्सप्रेस 10 मे रोजी जाखल, धुरी आणि लुधियाना मार्गे धावणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.