चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी रायबाग आणि कुडची मतदारसंघात मंगळवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
रायबाग : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी रायबाग आणि कुडची मतदारसंघात मंगळवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत कुडची मतदान केंद्रावर ६९.३३ टक्के तर रायबाग मतदान केंद्रावर ६९.९७ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
आज झालेल्या मतदान प्रक्रियेत युवक, युवती व महिलांनी उत्साहात मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
सकाळपासून दुपारपर्यंत मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानात सहभाग घेतला, दुपारी कडक उन्हामुळे मतदानाचा वेग मंदावला होता, सायंकाळी पुन्हा मतदानाची लगबग सुरू होती, मोठ्या संख्येने मतदारांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
टिप्पण्या