बावन सौंदत्ती येथे ट्रॅक्टर, दुचाकीच्या धडकेत एकजण जागीच ठार.
रायबाग : तालुक्यातील बावन सौंदत्ती गावात शनिवारी सायंकाळी ट्रॅक्टरची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकीस्वार वसंत बाबासाहेब देसाई (६४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते पत्नी व नातवासोबत रायबाग येथून स्वा गाव सौंदत्तीकडे जात असताना चिंचाळीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर असलेली पत्नी व नातू सुरक्षित बचावले.
याप्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पण्या