सैनिक टाकळीत नुकसानीचे तातडीने पंचनामेआमदार राजेंद्र पाटील यड्रावकर याच्या सूचनेनंतर गुुरुवारी सुट्टीदिवशीही यंत्रणा लागली कामाला 

जयसिंगपूर/प्रतिनिधी-
 सैनिक टाकळीमध्ये बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. 50 हून घरांचे नुकसान झाले.  झाडे उन्मळुन पडली. विद्युत खांब कोसळले, विद्युत वाहिन्या तुटल्या परिणामी वीज पुुरवठा खंडीत झाला. यानंतर माजीमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. गुरुवारी बुद्धपोर्णिमेच्या सुट्टी दिवशीही यंत्रणा कामाला लागली. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.
बुधवारी दुपारी सैनिक टाकळी परिसरास वादळी वार्‍याने तडाखा दिला. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान दहा मिनिटाच्या  कालावधीतच वादळी वार्‍याने 50 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. वार्‍याचा वेग इतका प्रचंड होता की घरावरील पत्रे उडून अर्धा किलोमीटर  दूर जाऊन पडले. जनावरांचे गोठे, घरे, शेड यांचे नुकसान झाले. अनेक घरावरील प्लास्टिक पाण्याच्या टाक्या वार्‍यामुळे दूर उडून पडल्या.  भागातील आडसाली ऊस जमीनदोस्त झाला. खिद्रापुर टाकळी रस्त्यावर झाड कोसळले. मारुती मंदिर नजीक मोठे झाड उन्मळुन पडल्याने  विद्युत वाहिन्या तुटल्या. मराठी शाळेच्या प्रांगणातील अनेक झाडे  उन्मळून पडली. शाळेच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले. विद्युत वाहिन्या तुटल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला.
दरम्यान या घटनेनंतर माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सैनिक टाकळीमधील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. गुरुवारी बौद्धपोर्णिमेची शासकीय सुट्टी होती. मात्र सुट्टी न घेता दिवसभरात पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देशही आमदार यड्रावकर यांनी दिले. याचबरोबर तुटलेल्या विद्युत वाहिन्या जोडून तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही आमदार यड्रावकर यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिल्या. यानंतर गुरुवारी दिवसभर यंत्रणा कामाला लागली. प्रशासनाकडून नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु होते. त्याचबरोबर महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.