हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांचा सत्कार.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.  


सेलू :- येथील साईबाबा नागरी बँकेच्यावतीने 2024
च्या हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांचा सत्कार  साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य कार्यलयात आज दि. 14 में 24 रोजी दुपारी 4 वाजता सत्काराचे आयोजन  करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर हे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष  चंद्रशेखर मुळावेकर, संचालक तथा माजी नगराध्यक्ष  पवन आडळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी  रामराव लाडाने सय्यद मुश्ताक, सय्यद मकसूद, अब्दुल रफिक, अब्दुल वाजीद, अतिख कुरेशी उपस्थिती होती. सन 2024 ला हज यात्रेला जाणारे सत्तार भाई  बागवान, रफिकभाई बागवान, खुदारहीम पाटोदकर,शेख जलील सयद रियाजद्दीन,सयद जफर भाई , मोहमद अर्षद बागवान,सलीम भाई बागवान, जावेद भाई बागवान, पठाण सुलेमान खान, मोहमद शहिद,सयद रियाजद्दीन शेख बिबन भाई यांचा सत्कार मक्का मदीनाची फ्रेम, शाल,हार देऊन केला या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व्यवस्थापक संतोष हुंगे यांनी केले. आभार व्यवस्थापक  पठाण निसार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शेख अबूजर, गजानन झुटे, प्रितेश जोशी, संतोष जायभाय, उमेश खरावणे यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.