समाजात एकता आणि बंधुता प्रस्थापित करणे गरजेचे आहे . ः संत रामपालजी महाराज .

यड्राव (प्रतिनिधी )                      मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे. तसेच पारंपारिक रूढी-परंपरा,दंतकथा ,
पाखंडवाद,अंधश्रद्धा या बाबींना छेद देत,सर्व धर्मांच्या पवित्र शास्त्रानुसार सतभक्ती कशी करावी आणि त्याचे प्रमाण देखील सत्संग समागमात दाखवण्यात आले.  आपण कोणत्या ही धर्माचे,जाती, पंथाचे, किंवा गरीब व श्रीमंत असलो तरी एकाच परमेश्वराची लेकरे आहोत आणि सगळे सर्व धर्माचे सद्ग्रंथ  हेच प्रमाण देत आहेत . सर्व समाजात एकता आणि बंधुता प्रस्थापित करणे गरजेचे आहे . असे जगतगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी कोल्हापूर येथील जाधववाडी येथे प्रवचनात सांगितले .                                              संत रामपालजी आपल्या प्रवचनात पुढे म्हणाले ,  आजर्यंत आपल्याला आपल्या सदग्रंथाचे पूर्णपणे ज्ञान नसल्यामुळे आपण आपल्या सद्ग्रंथाच्या विपरीत आचरण करत आहोत, आणि त्यामुळे आपण इतकी भक्ति करत असून ही दुःखी आहोत .यासाठी त्यांनी पवित्र गीता उघडून प्रमाण ही दाखवले, कि "पवित्र गीता अध्याय 16च्या श्लोक 23 व 24 मधे भगवान अर्जुनाला सांगत आहेत की, शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी पद्धतीने भक्ति आचरण करतात त्यांना काहीच लाभ होत नाही, त्यांचा मोक्ष देखिल होत नाही"      यामुळे आजपर्यंत सगळे इतकी भक्ति करत असून ही दुःखी आहेत. 
संत रामपाल जी महाराज सद्ग्रंथाच्या आधारे प्रमाणित सतभक्ती विधी  देऊन  समाज परिवर्तन करत आहेत ,आज दिवसें-दिवस लाखो लोक हे प्रमाण पाहून त्यांच्याशी जुडत आहेत. संत रामपाल जी महाराज यांचे समाज सुधारात ही मोठे योगदान आहे,जसे की हुंडामुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत ,भारतातून अस्पृश्यता नष्ट करने तसेच जाती-पातींचे वैर दूर करून समाजात एकता आणि बंधुता प्रस्थापित करणे गरजेचे  आहे. असे संत रामपालजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात सांगितले . 
सदर प्रवचनाच्या  कार्यक्रमास         भक्त तसेच भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . तसेच उपस्थित सर्वांनी  सत्यभक्ती ची माहिती  घेतली ,                     सदर प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन संत रामपाल जी महाराज यांच्या दयेने दास प्रकाश मुळे कोल्हापूर आणि समस्त अनुयायी यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.