उदगावमध्ये विवाहितेची आत्महत्या, पती, सासू-सासर्यावर गुन्हा
विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघाविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती सुमित दिलीप सुतार, सासरा दिलीप गुंडू सुतार व सासू शैलेजा दिलीप सुतार (सर्व रा.देसाई विद्या मंदिर जवळ उदगांव ता.शिरोळ) अशी संशयित आरोपींची नावे असून कोमल सुमित सुतार (वय २८) हिने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध व कौटुंबिक वादातून कोमलने आत्महत्या केल्याची तक्रार तिचा भाऊ रवींद्र कृष्णात सुतार (रा.घुणकी ता.हातकणंगले) यांनी पोलिसात आहे.
टिप्पण्या