काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आमदार मा.पांडुरंग निवृत्ती पाटील(पी एन पाटील) अनंतात विलीन
प्रतिनिधी:रियाज जैनापुरे
काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आमदार तसेच काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त म्हणजे 20 वर्षे जिल्हा अध्यक्ष पद भूषविलेले निष्ठावंत मा.पी एन पाटील हे काही दिवसापूर्वी त्यांच्या राजारामपुरी येथील घरामध्ये भुवळ येऊन पडले होते त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले त्या ठिकाणी त्यांना 5 ते 6 दिवस ठेवण्यात आले होते त्यांच्या मेंदूला इजा झाली होती मुंबई येथील न्युरो सर्जन यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती पण त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली बुधवार मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली करवीर चे आधारवड व ढाण्या वाघ अशी त्यांची ओळख होती आज त्यांची अंत्ययात्रा करवीर येथील सडोली खालसा गावातून काढण्यात आली सुमारे वीस पंचवीस हजार लोकांच्या मध्ये पी एन पाटील आनंतात विलीन झाले यावेळी गावातील वृद्ध महिला व पुरुष यांनी हंबरडा फोडला होता पीएन पाटील अमर रहे अशा घोषणा देत त्यांना शासकीय इसमात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले यावेळी सर्व पक्षातील मान्यवर उपस्थित होते तसेच करवीर तालुक्यातील सर्व गावे व गावातील व्यवहार बंद ठेवून पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
टिप्पण्या