सेलू शहरातील समस्या बाबत आमदार मेघना बोर्डीकर यांनी घेतला आढावा.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 
 

नगरपरिषद, विजवितरण अधिकाऱ्यासोबत बैठक संपन्न. 


सेलू : सेलू येथील  रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी शहरातील स्वच्छता, वीज समस्या बाबत रामप्रसाद बोर्डीकर यांनी आढावा घेतला.
सेलू शहरातील तुंबलेल्या नाल्या मच्छर फवारणी आणि हेमंत नगर, झाकीर हुसेन नगर, शिवाजीनगर नाल्या लगत चा भाग या ठिकाणची नाल्याची साफसफाई करण्यात यावी. व तसेच सेलू शहरात लोमकळलेल्या तारा तिच्या खांद्यावर आलेले झाडे यांची कटाई करावी व लाईन जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी दिल्या.या बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव ओ.एस. मल्लिकार्जुन स्वामी, स्वच्छता निरीक्षक व महावितरण चे प्रवीण थोरात यांची उपस्थिती होती.यावेळी एडवोकेट दत्तराव कदम, अशोक अंभोरे, कपिल फुलारी, गणेश काटकर, संदीप बोकन, गणेश गोरे, कृष्णा गायकवाड, अशोक शेलार आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.