नृसिंहवाडी येथे नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू

जयसिंगपूर प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे नदीकाठावर पारायण करत बसलेल्या युवकाचा पाय घसरल्याने नदीपत्रात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना  सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. तेजस दीपकराव कुलकर्णी (वय वर्षे २२ रा. गंगाखेड औरंगाबाद) असे त्या युवकाचे नाव असून याबाबत शिरोळ पोलिसात नोंद झाली आहे
        याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड औरंगाबाद येथून चंद्रकांत जोशी , रोहिणी जोशी या आजी -आजोबांच्या बरोबर तेजस कुलकर्णी हा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी आला होता.  सकाळपासून तो येथील  संगम काठावर पारायण करीत बसला होता. पारायण करीत असताना अचानक त्याचा पाय घसरल्याने तो नदीपत्रात बुडला व त्याचा यामध्ये मृत्यू झाला. यावेळी तेजस बुडल्याची माहिती कोणालाही नव्हती . त्याचे आजी - आजोबा परिसरात त्याचा शोध घेत होते. यावेळी वजीर रेस्क्यू फोर्सचे रऊफ पटेल व त्यांच्या टीमला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीपत्रात शोधा - शोध सुरू केली. यावेळी त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. 
       दरम्यान , श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बुडण्याची संख्या वाढली असून महिनाभरात ही चौथी घटना आहे. नदीपात्रात संरक्षणासाठी काहीच नसल्याने भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर आला आहे. दरम्यान वजीर रेस्क्यू फोर्स टिम वेळत
उपलब्ध असल्याने मृत्यूची घटना उघडकीस आली. मात्र, दत्त देव संस्थानकडू नदी काठावर सुरक्षेची कोणतीच उपाययोजना नसल्याने भाविकांत नाराजीचा सूर आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.