व्याख्यात्या स्वाती जंगम समाजप्रबोधन प्रेरणा पुरस्काराने सन्मानित...
कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय,इंगळे व गोल्डन ग्रुप हनुमान चौक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सतरावे मराठी साहित्य संमेलन शनिवार दि.25 मे 2024 रोजी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले...
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवोदित लेखिका कवयित्री स्वाती जंगम यांना एडओकेट सर्जेराव साळवे यांचे हस्ते समाजप्रबोधन प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले.. त्यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला... साहित्य क्षेत्राबद्दल त्यांच्या मनात असणारी प्रचंड आवड आणि आस्था याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी वर्णी लागली.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.गोविंद त्रिंबकराव लहाने (परभणी)होते... या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेते धुमाळ काका, गोपाळ वानखेडे, मराठी चित्रपट अभिनेत्री मीनाक्षी पाखरे, प्रा.सुरेश कुराडे कवि दीपक पवार उपस्थित होते..
अशोक शर्मा गोंदिया, आनंत सांळुखे बार्शी, मंगेश शिवलाल बरई नाशिक, संजय महाजन अहमदनगर,नयन पाड अमरावती, सौ.सुवर्णा अशोक मोहीते बार्शी, गवद बकराव लहाने परभणी, सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड, विजय पाटील तासगाव, दिपक कुंभार कसबा बावडा, किरण तायडे पुणे, . मिनाक्षी पाखरे मुंबई ,गोपाळ वानखेडे मुंबई ,पत्रकार आप्पासाहेब भोसले तारदाळ, कु.प्रतिभा बामणे परते, कु.त्रिवेणी कांबळे खोतवाडी , शांतीनाथ मांगले बलवडी, नथानियल शेलार कोल्हापूर, शांतीसधू नागरी सहकारी पतसंस्था इंगळी या मान्यवरांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले... कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कवी सरकारी यांनी केले तर कार्यक्रमाचे निवेदन कु. प्रतिभा बामणे यांनी केले.. कार्यक्रमाचे नियोजन अमोल दानोळे पाटील,आरती लाटणे, मनीषा वराळे यांनी केले...
टिप्पण्या