शेकडो नदीचे घाट बांधकाम व सात-बारा उतारा निर्माण करणार्या राजमाता अहिल्यादेवी होळकर . ः कुणालसिंह नाईक निंबाळकर

यड्राव  (प्रतिनिधी ) : 12 ज्योर्तिलिगांचा जिर्णोधार करणार्या महाराणी तसेच शेकडो नदीचे घाट बांधकाम व सात-बारा उतारा निर्माण करणार्या   राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय असे  प्रतिपादन व्यक्त केले.
यड्राव (ता.शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कार्यक्रमात ते बोलत होते .   यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले .
 सरपंच निंबाळकर पुढे म्हणाले, पेशवाई काळात त्यांनी चांगल्या प्रकारे आपले राज्यकारभार सांभाळळा, त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घेणे आवश्यक आहे. स्वत:च्या मुलगा मालेराव यांने केलेल्या कृत्याबद्दल त्यांना कडक शासन सुनावले होते. तसेच शेतीच्या विकासासाठी त्यांनी राज्यात अनेक योजना राबवल्या. माहेश्वर येथे त्यांनी हातमागावर साडया तयार करण्याचा मोठा उद्योग उभारला आजही माहेश्वर साडया प्रसिध्द आहेत. तसेच खासगी व सरकारी कोशासाठी व्यवस्था आखून दिली. आपल्या राज्यात कोणालाही दारिद्रय किंवा दु:ख भोगायला लागू नये यासाठी त्या नेहमी दक्ष असायच्या असे मत व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे, मंगल कांबळे, विकास लवाटे, ग्रामपंचायत कर्मचारी धीरज ठाणेकर, सतीश भोसले, जगदीश मूळे, प्रमोद सावेकर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.