यड्राव येथील भीषण अपघातात 1 महिला ठार तर , 10 जण जखमी

यड्राव (ता . शिरोळ )  येथे तवेरा चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. ही घटना आज (दि.१३) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. लालबी कलबुर्गी (रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव आहे. तारदाळ येथील संगमनगर मधील सनदी कुटुंबातील सर्व जखमी असल्याचे समजते. जखमींना सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे मार्गावर तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
घटनास्थळावरु  मिळालेली अधिक माहीती अशी की , 
 तारदाळ (ता . हातकणगंले ) संगमनगर  येथील सनदी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होते. नाईक निंबाळकर सेवा सोसायटी ओढ्याजवळ तवेरा कारवरील  (एम.एच.12 ई.एम.7422) चालकाचा दुसऱ्या वाहनाला चुकविताना ताबा सुटला. यामुळे गाडी तीन चार पलटी मारत रस्त्याकडेच्या ओघळीमध्ये पडली. यावेळी मोठा आवाज झाला. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लालबी यांचा रक्तस्त्राव अधिक झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार महिलांच्या डोक्याला, हाताला, पायाला, कमरेला मोठी दुखापत झाली.
या अपघातात पाच मुलेही जखमी झाले आहेत
या अपघातात पाच मुलेही जखमी झाले आहेत. त्यांच्याही डोक्याला, हाताला, पायाला, दुखापत झाली आहे. या सर्वांना रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठविण्यात आले .  घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहापूर पोलीस तब्बल पाऊण तासानंतर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.
पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविण्यात आला .  घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी   गर्दी केली होती. यावेळी मृतदेह व जखमींना पाहून अनेकांनी हंबरडा फोडला. सनदी कुटुंबीय यापूर्वी  रेणुकानगर, यड्राव येथे राहत असल्यामुळे या परिसरातील अनेक नागरिकांनी  त्यांना ओळखले. या घटनेमुळे उपस्थित नागरिकांतून हळहळ व्यक्त होत होती .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.