पवित्र हज यात्रेकरूंचा भव्यदिव्य असा सत्कार समारंभ संपन्न.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू : पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरू यांचा बोराडे यांच्या शास्त्री नगर येथील निवास स्थानी आयोजित खास संभारंभात बोराडे परिवाराच्या वतीने सहर्दय सत्कार समारंभ  करण्यात आला.ज्यात  सय्यद जफर सय्यद युसुफ,अब्दुल सत्तार अब्दुल रजाक,मोहम्मद रफीक अब्दुल रजाक, सतारभाई, शेख बिब्बन शेख हमीद, रियाजभाई,जलीलभाई, शिकुरभाई बागवान आदी हज यात्रेकरूना शाल, पुष्पहार,आणि मक्का मदिनाची छान अशी प्रतिमा व पवित्र कुराण ग्रंथ वाचन ठेवण्यासाठी पेटी आदी सह अत्यंत सहर्दयाने सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सेलू खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्री मुकेशभाऊ बोराडे, माजी नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष श्री प्रभाकर सुरवसे, माजी नगरसेवक मिलिंद सावंत,कासिमभाई,
वहीदभाई, इसाक पटेल, हाजी मेहमूद भाई,रमेश दौड, बालाजी सरकाले, व्यंकटबापू चव्हाण, नबाजीराव खेडेकर, राजेंद्र पवार,लक्ष्मण बुरेवार, जनाआबा सोळंके, सचिन कोरडे, अमर भैय्या सुरवसे, गौतम धापसे, मुख्याध्यापक श्री गोरे सर आदीजण उपस्थित होते.

स्थळ:- बोराडे निवास शास्त्री नगर सेलू 
दि:- 24 मे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.