धरणगुत्ती चोरीचा 24 तासात लागला छडा तिघांना अटक 5 लाखाचा ऐवज जप्त : रोहिणी सोळंके
जयसिंगपूर: प्रतिनिधी : धरणगुत्ती (ता शिरोळ) येथील गोसावी टेक खंडोबा मंदिरासमोर राहणाऱ्या श्रीमती पुनम अभिजीत पवार यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिरोळ पोलिसांना अवघ्या 24 तासात यश आले तिघांना अटक करून त्यांच्याकडून 5 लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे संशयित आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने 3 मे 2024 अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली
सोळंके म्हणाल्या की धरणगुत्ती येथील पुनम अभिजीत पवार यांच्या 25 एप्रिल ते 28 एप्रिल 2024 च्या मुदतीत बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील तिजोरीचे लॉक मोडून 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याची फिर्याद दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी शिरोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती
या चोरीचा तपास शिरोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू केला असता गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या 24 तासात प्रवीण सुभाष गाडीवडर वय 30 वर्षे रा आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर करण मधुकर पडियार वय 29 वर्षे रा गोसावी टेक माळभाग धरणगुत्ती सतीश संतोष नलवडे वय 23 वर्षे समडोळी मळा शाहूनगर जयसिंगपूर या तिघांना अटक केली संशयित तिघा आरोपींना जयसिंगपूर न्यायालयात उभे केले असताना न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले त्या मुदतीस त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांनीही चोरीची कबुली दिली चोरून नेलेले दागिने कुठे आहेत याची माहिती दिली पोलिसांनी या संशयित आरोपींनी चोरून नेलेले 3 तोळ्याचे सोन्याचे गंठण 3 तोळ्याचे नक्षी असलेले तोडे1 तोळा वजनाचे कानातील टॉप्स 1 तोळ्याची चेन 2 तोळे सोन्याच्या बांगड्या असे एकूण 5 लाख रुपयाचे दागिने जप्त केले चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी कौतुक केले
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने पोलीस हवालदार बाबा पटेल सहायक फौजदार इटाज पुजारी पोलीस हवालदार मडिवाळ खंडागळे कुंभार जाधव पोलीस नाईक मुजावर परब पाटील हेगडे शेख राठोड ओंबासे कदम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली
टिप्पण्या