मलिकवाड सरकारी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

मलिकवाड - अमर माने
मलिकवाड, ता. 31: येथील सरकारी मराठी, कन्नड प्राथमिक माध्यमिक व हायस्कूल शाळेत विविध कार्यक्रमानी  शुक्रवारी (ता.31) रोजी विद्यार्थ्यांचे प्रारंभोत्सव करण्यात आला. सर्वप्रथम शिक्षक,शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थित श्री सरस्वती प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढण्यात आले. त्यानंतर मराठी, कन्नड व हायस्कूल मुला, मुलींना शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला. यावेळी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकाची वितरण करण्यात आले. यावेळी यंदाच्या 2024-25 शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मंगळवारी (ता.28) रोजी गेले दोन दिवस शाळा स्वच्छ करणे, आवारातील कचरा गोळा करणे, झाडांना पाणी घालणे यासह, विविध शाळेतील कामे करण्यात आली होती. 

यावेळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक अजित माने, एस.एन.निवलगी, एम.बी. केरुरे, शिरीष माने, आय.एम. नदाफ, मीनाक्षी ढवळे, बी.एल.बेदरकर, एस. बी.चौगुले, एस.एस.पंडित, लोकरे मॅडम, मोपगार, माळगे यांच्यासह, विद्यार्थी, शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.