यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम.
शिवाजी शिंदे
सेलू : सेलू शहरामध्ये यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाने एच.एस.सी परिक्षा -2024 मध्ये यशाची परंपरा कायम ठेवत विज्ञान शाखेतून चि. करवा अमेय सतिश या विद्यार्थ्यांने 88.83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. श्रध्दा गोवर्धन उगले या विद्यार्थीनीने 79.17 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला. तर कु. जयश्री माणिकराव पौळ (75.67 टक्के) गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. तसेच वाणिज्य शाखेत चि. घोडके युवराज शिवाजीराव (88.67 टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. शितल नारायण आष्टकर (87.50 टक्के) या विद्यार्थीनीने दुसरा क्रमांक व कु. श्रध्दा कुंडलीक बागल (84.33 टक्के) गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. आणि कला शाखामध्ये चि. सिमा गुलाबराव गजमल (83.50 टक्के) गुण मिळवून पहिला क्रमांक व कु. निकिता अशोकराव गजमल (77.30 टक्के) गुण घेऊन दुसरा क्रमांक मिळवला. चि. शेख समिर गुलाब या विद्यार्थ्यांने (77.17 टक्के) तिसरा क्रमांक.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यां चा सत्कार तसेच गुणगौरव संस्थेचे अध्यक्ष मुकेश हरिभाऊकाका बोराडे व संचालक साईराज मुकेशभाऊ बोराडे महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षकाकडून करण्यात आला.
टिप्पण्या