तब्बल पंचवीस वर्षानंतर श्री गणेश विद्यालय,कुंभार गल्ली येथील शाळेतील माजी विद्यार्थी आले एकत्र

कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपापल्या कामात व्यस्त असणारे पण कुठेतरी लहानपणीच्या आठवणी मनात  साठवून असणाऱ्या म्हणजे बालपण अशा बालपणीच्या शालेय आठवणी जाग्या करण्यासाठी कोल्हापुरातील जुन्या काळातील प्रसिद्ध अशी अनंत रघुनाथ लाटकर नाना गुरुजी यांची श्री गणेश शाळा कुंभार गल्ली पापाची तिकटी येथील 1993 ते 1999 पर्यंतच्या पहिली ते सातवीतील एकत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व शिक्षकांचा सत्कार पार पडला. यामध्ये सगळ्यात वयोवृद्ध अशा शिक्षिका देशपांडे बाई 85 वय, चव्हाण सर,नामदेव गुरुजी, सतारमेकर बाई,संध्या बाई, कांबळे सर यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी अरविंद कोळी, सुदर्शन कुंभार,तुषार पाडळकर स्वाती ससे, प्राजक्ता पाटील यांच्या सहयोगाने पार पडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.