मोहमद रफिक सर यांचा सेवा (शिक्षक )निवृत्त झाल्या बद्दल सत्कार.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

 
सेलू :-दि. 09 रोजी सेलू येथील गुलमोहर कॉलनी येथे मुस्लिम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी च्या वतीने सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील  मोहंमद रफिक सर हे नियत वयोमानानुसार शिक्षक या पदावरून सेवा निवृत्त झाले आहे त्यांनी शेवली येथील अलिजोहर उर्दू हायस्कुल सस्था  मध्ये 30 वर्ष कार्य केले 
उपस्थित मान्यवरानी शिक्षक रफिक सर यांनी केलेल्या सेवेचा आणि त्त्याच्या कार्याचा गुण गौरव केला. या त्याच्या सेवानिवृत्ती चा दिवस म्हणजे एक त्यांना सन 2024 मध्ये ते  पवित्र हज यात्रा ला नंबर लागला आहे. हे त्याच नशीब म्हणावं लागेल. त्याचा सेवा निवृत्ती चा काळ आनंदात व चांगले आरोग्य लाभो या साठी शुभेच्छा दिल्या व मान्यवराचे हस्ते त्यांना हार शाल मक्का मदीना चे फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार ला उत्तर देताना रफिक सर म्हणाले कि मला सेलू शहरातील काही वरिष्ट लोक व मित्रा चे वेळो वेळी मिळालेले मार्गदर्शन व सहकार्य ते मी शिक्षक पदाचे सेवा यशस्वी रित्या पार पाडू शकलो यशस्वी सहकार्य मिळणे अतिशय महत्वाचं आहे माणसाने आपल्या जीवनात सतत चांगले कर्म करावे. असे त्यांनी सांगितले. या वेळी मुस्लिम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी चे हाजी शफिख अली खान, विदयुत अभियंता अनिस कुरेशी, शेख महेमूद सर, निसार पठाण, शेख मौजम सर, पठाण रशीद खान इजींनिअर, हारून सर, इमामोद्दीन, शेख असगर, शेख शमशोद्दीन, जकी सिद्दीकी सर, इम्रान कुरेशी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  हारून सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.