खोतवाडी तारदाळात शांततेत मतदान, खोतवाडीत 68% टक्के, तर तारदाळात 70% मतदान

विशालक्रांती वृतसेवा - हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा हक्काचा खासदार निवडीसाठी लागलेली निवडणूक प्रक्रिया आज मंगळवार दिनांक 7 मे रोजी सकाळी सात वाजले पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खोतवाडी तारदाळ येथे सकाळपासूनच प्रत्येक बुथवर मतदान करण्यासाठी पुरुष आणि महिलांनी मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. खोतवाडीत  एकूण 4028 मतदार असून 2739 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 68% मतदान झाले तर, तारदाळ येथे 11536 मतदार असून 8087 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच एकूण 70% मतदान झाले.
          मतदान केंद्र 23 - एकूण मतदान 1440 पैकी झालेले मतदान 967, 
केंद्र क्रमांक 24 - एकूण मतदान 1377 पैकी झालेले मतदान 955, 
तर केंद्र क्रमांक 25 - एकूण मतदान 1211 पैकी झालेले मतदान 817 असे एकूण 2739 मतदान झाले.

तारदाळ केंद्रनिहाय झालेले मतदान असे,
      क्रमांक १४ - एकूण १२०६  पैकी झालेले मतदान  ८५३,
      क्रमांक १५ - एकूण १२२५  पैकी  झालेले मतदान  ८३८,
      क्रमांक १६ - १४४८  पैकी  झालेले मतदान  १००८,
      क्रमांक १७ - १२०४  पैकी   झालेले मतदान ८४१,
     क्रमांक  १८ - १३९५  पैकी    झालेले मतदान ९२९,
      क्रमांक  १९. १३१३  पैकी    झालेले मतदान ९४७,
       क्रमांक २०. १२५५  पैकी   झालेले मतदान ९३७,
       क्रमांक २१. १२५७  पैकी  झालेले मतदान  ९२०,
       क्रमांक २२. १२३२  पैकी   झालेले मतदान ८१६,
       एकूण मतदान ११५३५ मतदारां पैकी ८०८९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण  ७०% मतदान झाले.
    सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार, घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.