खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात डॉ.ए.पी.जी.अब्दुल कला यांच्या प्रतिमा पुजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.यानंतर श्री.सी.बी.समाजे सर यांनी आपल्या मनोगतातून डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांच्या जीवना विषयी आपल्या मनोगतातून माहिती सांगितली.तसेच पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांच्या कार्याची,त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची माहिती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.तसेच वाचन प्रेरणा दिना निमित्त वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणुन शालेय परिसरातील पाच कुटुंबामध्ये विद्यालयाच्या वतीने वृत्तपत्राचे वाटप करण्यात आले.तसेच विद्यालयामध्ये 
डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांची वेशभूषा आयान नदाफ इयत्ता 9वी या विद्यार्थ्याने सादर केली.
          या प्रसंगी सर्व शिक्षक- शिक्षिका,विद्यार्थी-विद्यार्थीनी,
शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.समाजे सी.बी.यांनी केले तर आभार श्री.हेमगिरे एस.के.यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.