शिरोळ तालुक्यातील विद्यार्थी आमदार यड्रावकर यांच्यासोबत असतील: प्रतीक कुन्नूरे
आमदार यड्रावकर साहेबांचा कार्यकाळ हा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे ज्या अपेक्षेने लोकांनी आमदार साहेबांना निवडून दिले त्याच अपेक्षाची साहेबांनी व्याजासकट परतफेड केलेली आहे प्रत्येक खेडूपाड्यात कोट्यावधीचा निधी देणे हे पहिल्यांदाच घडले आहे महापूर कोरोना राजकीय अस्वस्थ असतानाही लोकांची समस्या सोडवण्यात व विकास कामात कधीच कमी पडले नाही तर जिथे कमी तिथे आम्ही याप्रमाणे साहेबांचे काम चालू होतं असा आमदार मिळाला हे आपल्या सर्वांचे भाग्यच आहे. कोविड नंतर विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत होत नव्हत्या त्या परीक्षा विद्यापीठ अंतर्गत सुरळीत घेण्याचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानी पासून वाचवण्यासाठी आमदार साहेबांनी खूप आम्हाला मदत केली आहे. वेळोवेळी शिक्षण मंत्र्यांनाही याचा पाठपुरावा त्यांनी केली आहे. म्हणून आज आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहून त्यांना पुन्हा एकदा आमदार करण्याचे आपली जबाबदारी आहे.
राष्ट्रवादी पार्टी विधानसभा अध्यक्ष अमर भैया माने, प्रकाश पाटील टाकवडेकर ,यांच्या माध्यमातून आम्ही शिरोळ तालुक्यातून त्यांना नक्कीच लीड देऊ असा विश्वास आम्ही व्यक्त केला.
टिप्पण्या