कष्टकरी राजा हरपला :रावसाहेब दादा
शेत कसण्यासाठीच आपलं आयुष्य वेचलेला हा शेतकरी.बैलांच्यावर अतूट प्रेम.शेत,गोठा आणि घर याच त्रिकोणात आपला पडका संसार उभा केला.माती आयुष्याची भाकरी देते म्हणून शेतातच रमला.मनोज -अप्पा या कर्त्या दोन मुलांचं बस्तान बसविलं.लेकीच्या संसार सुखाने डोळे सुखावले.अवघाची संसार सुखाचा करीन याच तळमळीने कुटुंबासाठी धडपडला.भावांची चांगली साथ होती. त्यापैकी महावीर भावाकडेच मन मोकळं करायचा. विभक्तपणाच्या भिंती वेगळ्या असल्या तरी नात्यात कधीच अंतर पडू दिलं नाही.जुन्या गावगाड्याच्या वळणावर हळव्या मनात माणुसकी जपत राहिला. कर्तव्यावर निष्ठा ठेवून समोर दिसेल ते काम पूर्ण करणेत स्वताला धन्य समजला.अखेर दि 23/10/2024रोजी देहावर कष्टमय छटा घेऊनच अंतर्धान पावला.उद्या दि 24/10/24रोजी सकाळी 8वा रक्षा विसर्जन... या पुण्यात्म्यास चिरशांती लाभो हीच भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻
टिप्पण्या