कोठेकर कुटुंबीयांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी-श्री जयप्रकाशजी बिहाणी.
शिवाजी शिंदे
नूतन कन्या प्रशालेत स्वर्गीय सौ. कल्पना नितीन दीक्षित (कोठेकर )स्मरणार्थ शुद्ध जल प्रकल्प सेवार्थ समारोह.
सेलू :शाळेच्या शिकवणीला स्वतःच्या वागणुकीतून सत्यात उतरवून दाखवणाऱ्या स्व. सौ.कल्पना नितीन दीक्षित (कोठेकर) स्मरणार्थ कोठेकर कुटुंबीयांचा विद्यार्थिनींसाठी शुद्ध जल प्रकल्प सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे
जयप्रकाशजी बिहाणी यांनी प्रतिपादन केले.
दि.5 ऑक्टो. 2024
नूतन विद्यालय शिक्षण संस्था सचिव प्राचार्य डॉक्टर व्ही.के कोठेकर आणि परिवार यांच्या आर्थिक योगदानातून स्व. सौ. कल्पना नितीन दीक्षित (कोठेकर) यांच्या स्मरणार्थ नूतन कन्या प्रशालेत शुद्ध जल प्रकल्प सेवार्थ समारोहाचे आयोजन श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागात करण्यात आले होते .याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी बोलत होते. व्यास पीठावर अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायणजी लोया, उद्घाटक नितीन दीक्षित ( अभियंता नाशिक), नूतन विद्यालय शिक्षण संस्था उपाध्यक्ष डि.के देशपांडे, संस्थेचे सचिव प्राचार्य व्ही.के. कोठेकर, संस्थेचे सहसचिव जयप्रकाश जी बिहाणी, महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर, अमृत कोठेकर, अश्विनी कोठेकर ,
उत्कर्षा दीक्षित, नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारणी सदस्य प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, अजित खा पठाण, दत्तरावजी पावडे ,मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सुवर्णा राऊत , प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्या पक दत्तराव घोगरे , पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. सौ. कल्पना नितीन दीक्षित (कोठेकर )स्मरणार्थ शुद्धजल प्रकल्प कोनशीला अनावरणा ने तथा स्वर्गीय कल्पना ताई यांच्या प्रतिमेच्या पुष्पांजलीने झाली.
याप्रसंगी सच्चिदानंद डाखोरे यांनी जलगीत सादर केले. समारोहाचे प्रास्ताविक प्राचार्य शरद कुलकर्णी यांनी केले. स्व. कल्पना दीक्षित यांच्या जिवलग सखी पल्लवी चारठाण कर यांच्या भावनिक संदेशाचे वाचन कीर्ती राऊत यांनी केले.
कोठेकर परिवाराचे कृतज्ञतापूर्वक स्वागत करत असताना चित्रकला शिक्षक गजानन मजगे यांनी स्व. कल्पनाताई यांची साकारलेली कलाकृती आठवणीचा ठेवा म्हणून नितीन दीक्षित यांना देण्यात आली.
याप्रसंगी स्वर्गीय कल्पना दीक्षित यांचे यजमान नितीन दीक्षित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रा. संजय पिंपळगाव कर यांनी देखील स्व. कल्पना दीक्षित यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला.इयत्ता सातवी क च्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयांतर्गत रेणुका आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या मासिकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कोठेकर कुटुंबीयाचे आभार मानत कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ.सत्यनारायणजी लोया यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कीर्ती राऊत यांनी तर आभार मुख्याध्यापिका निशा पाटील यांनी मानले.
कार्यक्रमासाठी भालचंद्र कोठेकर, कुमार कोठेकर, सर्वेश्वर कोठेकर, मल्हारीकांत देशमुख, गंगाधर गळगे, नारायण इक्कर, रवी मुळावेकर ,रघुनाथ देशमुख ,ना.मा. देशपांडे ,संतोष पाटील, सुखानंद बेंडसुरे, अनिल रत्नपारखी,श्रीमती वाघोलीकर, सुरेखा रामदासी, हेमलता देशमुख, डॉ.शिवाजी शिंदे, कोठेकर कुटुंबीय ,नूतन कन्या प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,
विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भालचंद्र गांजापुरकर, शशिकांत देशपांडे, नागेश देशमुख, यशवंत कुलकर्णी सुषमा दामा, यांनी सहकार्य केले.
टिप्पण्या