प्रेषित मुहम्मद(स.अ.) यांच्या जिवनावरील निबंध स्पर्धेस प्रतिसाद.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

अल फलाह एज्युकेशन & वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम.
 
सेलू : मिलादुन्नबी च्या निमित्ताने प्रेषित मुहम्मद ( स‌. अ. ) यांच्या जिवनावरील विविध पैलूंवर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन अल फलाह एज्युकेशन & वेल्फेअर सोसायटीच्या वतीने वर्ग ५ ते ७ व वर्ग ८ ते १० या दोन गटात ऊर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते‌.या स्पर्धेत वेगवेगळ्या शाळेतून २६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत वर्ग ५ ते ७ या गटात प्रथम- पठाण आदिना फीरदोस (डाॅ.  झाकेर हुसैन प्राथमिक शाळा), द्वितिय- शेख शिफा फातिमा ( यासेर ऊर्दू प्राथमिक शाळा ), तृतीय - हुजैफ खान ( शैलजा ऊर्दू प्राथमिक शाळा ) , तृतीय - आयेशा सिद्दिखा ( डाॅ. झाकीर हुसेन ऊर्दू प्राथमिक शाळा ), उत्तेजनार्थ रहेमीन अरमिन केंद्रीय प्राथमिक ऊर्दू शाळा ) हे विद्यार्थी तर माध्यमिक गटात प्रथम मिसबाह बेगम ( डाॅ. झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल ),  द्वितीय आदिबा वाहिनी  ( झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल ) , तृतिय-  जरका इरम ( झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल ) उत्तेजनार्थ - आलिया कौसर ( यासेर ऊर्दू हायस्कूल ) हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अल फलाह एज्यु केशन & वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्ष अनिस कुरेशी, उपाध्यक्ष  महेमूद सर सचिव शफिख आली खान व पदाधिकारींनी अभिनंदन केले‌.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.