अर्लिअन कवियों का अध्यात्म बहुउद्देशीय उपक्रम अंतर्गत मुलांच्या व महिलांसाठी स्पर्धा, कार्यक्रम संपन्न.

अर्लिअन कवियों का अध्यात्म तर्फे संपूर्ण भारतभर अनेक बहुउद्देशीय उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे .या अंतर्गत कोल्हापूर शिरोली येथे कुमार विद्या मंदीर शाळेत  30 सप्टेंबर रोजी एक छोटासा मुलांसाठी व महिलांसाठी स्पर्धा व खेळ असा उपक्रम घेतला .मुलांनी झांज पथक घेऊन वाजत गाजत आयोजकांना शाळेत आणले प्रवेशद्वारावर त्यांचे औक्षण झाले.
कार्यक्रमाचे रंगतदार व खुमासदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक संदीप कोरवी सरांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अर्लिअन कवियों का अध्यात्मच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख सौ.रोहिणी अमोल पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पवार सर यांनी उत्कृष्टरित्या जबाबदारी बजावली.
मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे परीक्षण वीणा पाटील व संजना पाटील या दोघींनी केले त्यात अनुक्रमे तीन विजेत्यांचे नंबर काढण्यात आले. त्यांची नावे
फॅशन शो स्पर्धा

१. प्रणिता संजय कांबळे


२ .अर्पिता संदीप कोरवी.
३.प्रज्वल दिलीप घोरे
महिलांची उखाणा स्पर्धा घेतली .त्याचे परिक्षण श्री दत्तात्रय गुरव सरांनी व रेश्मा घोरे यांनी केले .त्यात अनुक्रमे  तीन  विजेते नंबर काढण्यात आले.
    उखाणे स्पर्धा
१.सौ.सुजाता सुजित कांबळे.
२.सौ.सुप्रिया संदीप कोरवी

३. सौ.सारा जालिंदर कांबळे.


मुलानी ग्रीटिंग्स तयार केले. तसेच रुमालापासून अनेक प्राणी तयार करायला सौ. सुप्रिया कोरवी  मॅमने मुलांना शिकवले. बायकांनी अभंग म्हटले जात्यावरच्या ओव्या म्हटल्या.
या सर्व कार्यक्रमाचे शुटिंग व फोटो श्री. अमोल पराडकर यांनी केले .
कार्यक्रमासाठी परिसरातील मुले व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.