जांबोटीनजीक झालेल्या अपघातात विद्यार्थी ठार
कंटेनर वाहन व दुचाकी यांच्यात धडक झाल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील जांबोटीजवळ घडली.
निखिल बाबागौडा पाटील (१९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो चिक्कोडी तालूक्यातील मांजरी गावचा रहिवासी असून बेळगाव येथील जीआयटी येथील महाविद्यालयात पीयूसी फर्स्ट इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मूडलगी येथील निखिल रमेश बेलकूडे हा दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. आज वाल्मिकी जयंतीनिमित्त कॉलेजला सुट्टी असल्याने हे दोन्ही विद्यार्थी जांबोटीजवळ फिरण्यासाठी दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुशार विद्यर्थ्याचा अपघातात निधन झाल्याचे समजताच मांजरी गावाला धक्का बसला.निखीलच्या अचानक जाण्याने पाटील कुटूंबियांवर दुखाचा डोंगर कोसळल्याने सांत्वन करण्यासाठी आलेल्या़ंचे डोळे पाणावत होते.
टिप्पण्या