देऊळगाव गात ग्रामपंचायातवर भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद वर्चस्व.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

भाजपा चा दणदणीत विजय. 

सेलू : आज दि. 07 ऑक्टोबर 2024 रोजी देऊळगाव गात ग्रामपंचायत सरपंच पदी भारतीय जनता पार्टीच्या सौ.लक्ष्मीबाई दत्ताराव कदम यांची निवड करण्यात आली. त्यावेळी मा. सरपंच सौ. मीनाताई गोरे,ग्रामपंचायत सदस्य सौ.भाग्यश्री दत्ता कदम,सौ.शालन सुधाकर कदम, लक्ष्मीबाई लक्ष्मणराव तांबे,सौ.शांताबाई सोनटक्के, श्री.रवींद्र विठ्ठल गोरे,गणेश तुकाराम काळे,
शिवाजी कदम इत्यादी ग्रामपंचायत  सदस्य उपस्थित होते.देऊळ
गाव गात ही ग्राम पंचायत राष्ट्रवादी तुतारी गटाच्या ताब्यात होती.माजी सरपंच सौ. मीनाताई गोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाली होती. काल दी 7:10:2024 रोजी फेरनिवडणूक होती यावेळी फेर निवडीत  भारतीय जनता पार्टीच्या सौ लक्ष्मीबाई दत्ताराव कदम निवडून आल्या.या निवडणुकी त भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष दत्तराव कदम यांनी पुढाकार घेतला. तालुक्याच्या विकास रत्न आमदार सौमेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष ॲड.दत्तराव कदम यांच्या पुढाकाराने देऊळगाव गात येथील ग्रामपंचायत वर भाजपची एकहाती सत्ता आली.निवडणु
कीच्या यशस्वीतेसाठी माजी उपसरपंच विशू तात्या कदम,दतराव तांबे आणि शिवाजी राव कदम यांनी विशेष प्रयत्न केले.तसेच भाजपा परिवारातील तंटामुक्ती अध्यक्ष त्रंबकअपा कदम, माजी जि. प. सदस्य शिवाजी जिजा कदम, ॲड. तालुकाध्यक्ष दत्ताराव कदम,दत्ता आबा कदम,संतोष सोनटक्के,दत्ता तांबे,गोरख मगर, विश्वनाथ मांडाखळी कर,बालासाहेब संत, बालासाहेब कदम, रोहिदास गायकवाड, माऊली कदम,सचिन कदम,ऋषी कदम,
किरण कदम, माऊली कदम, अमर कदम, कृष्णा कदम वैभव कदम आदी जण उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.