बोरगाव येथे महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
रामायणकार व आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती बोरगांव येथील समस्त वाल्मिकी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, प्रारंभी बोरगांव येथील युवा नेते उत्तम पाटील,माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले,हाल सिद्ध नाथ साखर कारखान्याचे संचालक श्री शरद जंगठे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतीमेस पुष्प अर्पण करून श्रीपळ वाढविण्यात आले
यावेळी उपस्थित मान्यवरांचा समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम दरम्यान बोलतांना सहकार रत्न युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की आज अखंड मानव जातीला महर्षी वाल्मिकी ऋषींच्या विचारांची प्रेरणा घेणे गरजेचे आहे, बंधूभाव कसा असवा हे ऋषिने आपल्या रामायण ग्रंथातून सांगितले आहेत, यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब हावले आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की भारत ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते , संत अथवा महापुरुष यांचे विचार हे कोणत्याही समाजाशी निगडीत नसून सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेली सेवा ही एक प्रेरणा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. साखर कारखान्याचे संचालक श्री शरद जंगठे म्हणाले की आपण केवळ जयंती पुरतेच महर्षी वाल्मिकी यांची पूजा न करता दैनंदिन जीवनात त्यांचे विचार आचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, ऋषींनी रामायण सारखा पवित्र महाग्रंथ देऊन जगात भारत देशाचे नाव उज्ज्वल केले आहेत,
सकाळी 11 वाजता समस्त कोळी समाजाच्या वतीने आरती घेण्यात आली. व दुपारी महाप्रसाद करण्यात आला संध्याकाळी रामायण कार, आद्य कवी, महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेची मिरवणूक,वाद्यांच्या गजरात काढण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपाध्यक्ष सौ. भारती वसवाडे , विद्यमान नगरसेवक अभय मगदूम, तुलसीदास वसवाडे, पिंटू माळी, अमर शिंगे, जितू पाटील, अशोक नेजे,बाळासाहेब वसवाडे, आप्पासाहेब नेजे, बापू दत्तवाडे, श्रीकांत वसवाडे, प्रकाश तळवार, गुरुदास वसवाडे, टिंकू वसवडे, सुनील नेजे, आण्णाप्पा अकिवाटे, बापू नेजे, बाबासाब वसवडे सह परिसरातील कोळी समाजाचे युवा कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
टिप्पण्या