हातकलंगले विधानसभा मतदारसंघातून तिरंगी लढत निश्चित डॉक्टर सुजित मिणचेकर लढण्यावर ठाम

हुपरी प्रतिनिधी - 278 हातकलंगले विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे अधोरेखित झाली असून या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे व डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्यामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असून या महाविकास आघाडी मधून आमदार राजूबाबा आवळे यांना जवळजवळ उमेदवारी निश्चित मानली जात असून डॉक्टर सुजित मिणचेकर यांची काय भूमिका असणार यावर सर्वांचे लक्ष लागले असून 
महायुतीतून दलितमित्र अशोकराव माने जनसुराज्य कडून जवळजवळ निश्चित असून 
या दोन्ही महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार जवळपास ठरले असल्याने राहीला प्रश्न 
डॉक्टर सुजित मिणचेकर यांचा ते आपली भूमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवत असून 
 त्यांच्या मुंबईत बैठकांचा धडाका सुरू आहे 
कारण 35 दिवस राहिले असून यामध्ये प्रचार यंत्रणा राबवणे व उमेदवारांनी सर्व तालुक्यांमध्ये गावांमध्ये पोहोचणे हे महत्त्वाचे असल्याने 
तसा डॉक्टर सुजित मिणचेकर यांचा दहा वर्षाचा अनुभव पाहता ते तळागाळात पोहोचले असून 
अशोकराव माने हे देखील त्यांच्या बरोबरीने तळागाळापर्यंत पोहोचले आहेत 
परंतु यामध्ये डॉक्टर सुजित मिणचेकर दलितमित्र अशोकराव माने या दोघांच्या मध्ये काटे की टक्कर होणार असून राजूबाबा आवळे यांचा पाच वर्षाचा लेखाजोखा पाहता हातकलंगले विधानसभा मतदारसंघातील जनता त्यांच्यावर नाराज असल्याचे काहीसे चित्र आहे.
ठोस उठावदार काम नसल्याने विद्यमान आमदार तीन नंबर वर राहू शकतील असा राजकीय तज्ञाचे अंदाज असुन डॉक्टर सुजित मिणचेकर व अशोकराव माने यात लढत होणार पण अद्याप डॉक्टर सुजित मिणचेकर यांची भूमिका महत्त्वाची असून कोणत्या पक्षात जाणार की अपक्ष लढणार हे जाहीर करणं बाकी असुन 
परंतु डॉक्टर सुजित मिणचेकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.