कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, मुंबई, विद्यार्थी गुणगौरव समारंभ, (मुंबई विभाग).

मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर  

उपरोक्त संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता दहावी ७०%, बारावी ६५% तसेच पदवी, पदविका, उच्च शिक्षण परिक्षा ६०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या फक्त भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, स्थळ : कित्ते भंडारी सभागृह, शिवसेना भवन जवळ, दादर, ४०००२८, येथे लवकरच आयोजित करण्यांत येणार आहे.
  इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज भरुन देणे आवश्यक आहे.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
(शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४)
वि.सू. प्रवेश अर्जासोबत शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ च्या मूळ गुणपत्रिकेची व खालील पैकी भंडारी जातीचा उल्लेख असलेल्या "एका" कागद पत्राची स्वसाक्षांकित केलेली प्रत जोडणे आवश्यक आहे.
१) वडिलांचा किंवा विद्यार्थ्याचा *भंडारी* जातीचा दाखला
२) वडिलांचा किंवा विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला ज्यावर भंडारी ज्ञातीची नोंद असणे आवश्यक.
३) भंडारी मंडळाने दिलेले जात प्रमाणपत्र

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४, वेळ : सकाळी १०.३० ते सायं ७.३० पर्यंत

अर्ज स्विकृती स्थळ : कित्ते भंडारी सभागृह, शिवसेना भवन जवळ, गोखले रोड, (उत्तर) दादर, मुंबई-४०००२८

आपला,
श्री. अरविंद रामचंद्र सुर्वे
(सचिव, कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, दादर )
भ्रमणध्वनी क्र. ९८७०९०१२१८
‐----‐-----------‐--‐‐-‐‐‐----‐-‐‐---‐-‐‐‐--------‐--------‐--------
*संपर्क : श्री. संतोष बाबुराव मांजरेकर,*
*निमंत्रक : विद्यार्थी गुणगौरव समिती*
*सहसचिव, कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी दादर*
*भ्रमणध्वनी क्र. ८३५५९४७३११*
‐----‐-----------‐--‐‐-‐‐‐----‐-‐‐---‐-‐‐‐--------‐--------‐--------
*(विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रमाचा दिवस आणि वेळ नंतर जाहीर करण्यात येईल)*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.