जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद परभणी, योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी आणि नूतन महा विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा दि. 01 ऑक्टोबर रोजी नूतन महा विद्यालयाच्या क्रीडा हॉलमध्ये यशस्वी संपन्न झाली. एकूण नऊ तालुक्यातील वयोगट 14, 17, 19 मुले / मुली या सर्वांच्या ट्रॅडिशनल,आर्टिस्टिक, रीदमिक या योगा प्रकाराच्या स्पर्धा महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या तांत्रिक मार्ग दर्शनाने घेण्यात आल्या. एकूण 200 मुला मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धे च्या उद्घाटन समारंभा चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उत्तम राठोड उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक अनंत घावडे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती  अतुल दातार, प्रवीण सोनवणे, कृष्णा कवडी, तालुका क्रीडा संयोजक  प्रशांत नाईक, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, देविदास सोन्नेकर प्रा. नागेश कान्हेकर उपस्थित होते.भारताने संपूर्ण जगाला दिलेली आयुर्वेदाप्रमाणेच योग ही देणगी तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासा ठी लाभप्रद आहे असे उद्गार व्यवस्थापक अनंत घावडे यांनी काढले. याप्रसंगी नूतन योगा सेंटरच्या योगपटूं नी आकर्षक योगासने सादर केली.प्रास्ताविक देविदास सोन्नेकर यांनी आभार मानले. तर सूत्रसंचालन नागेश कान्हेकर यांनी केले. 
अंतिम निकाल पुढील प्रमाणे आहे. वयोगट 14 मुले जाधव सोम नाथ, कदम कृष्णा, पिंडगे संकेत, रकटे तथास्तु, कुकडे धोंडीबा वयोगट 17 मुले पद्मनाभ काटे, साहिल काळे, शिवराम मस्के, प्रल्हाद पवार, ओंकार कुटे वयोगट 19 मुले नचिकेत आळणे, आदित्य उन्हाळे, शिवम देशमुख, सुमित गरुड, मदन देशमुख वयोगट 14 मुली श्रावणी लाड, अक्षरा हरकळ, देवांशी टेळकीकर, मनस्वी सोनी, प्रीती म्हेत्रे वयोगट 17 मुली सृष्टी सोळंके, दिव्या बोंबले, अंजली गायकवाड, सानवी घिके, भक्ती आवटे वयोगट 19 मुली श्रुती खंदारे, इरा खापरखुंटीकर, श्रेया घीके, वैष्णवी जगताप, पौर्णिमा देशमुख आर्टिस्टिक योगा वयोगट 17 मुली सानवी घिके, रिदमीक योगा वयोगट 14 मुली देवांशी टेळकीकर, वयोगट 17 मुली साक्षी गायके, वयोगट 19 मुली पूजा काळे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून सोमनाथ महाजन, माधव देशपांडे, सुषमा सोमानी, सुश्मिता भरदम, शिल्पा पिंपळे, कृष्णा होलिया, कांचन वसेकर, ऋतुजा देशमुख, रावसाहेब पदमपल्ले, वरकड, आनंद क्षिरसागर रामा गायकवाड यांनी नागेश कान्हेकर, देविदास सोन्नेकर, कृष्णा कवडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.