वारकरी सांप्रदायातला विठ्ठल हरपला.......!

अत्यंत शांत,
संयमी,
*जिव्हाळ्याचा झरा* म्हणून ज्यांच्याकडे पाहत होतो ते *सदाशिव कुंभार काका*....!
   अकिवाटच्या माळावरील *कुंभार बंगला*
आज पोरका झाला.
ज्यांची वाणी अमोघ होती, आणि दूरदृष्टी वाखाणण्याजोगी....!
असा एक अवकाशातला *शुक्रतारा* निखळून पडला.
*सदाशिव काका* म्हणजे अकिवाटची शान होती.
कुंभार कुटुंबीयांची मान होती.
आपल्या जीवनात आखीव रेखीव रचना होती,
आपल्या मुलांना विचारांचा वारसा दिला होता.
मुलंही कर्तुत्ववान आणि कामसू निघाली.
वीटभट्टीच्या व्यवसायामुळे अनेकांशी ऋणानुबंध जुळले, ते रुजले.
  खत पाणी घातले.
आपल्या आयुष्यात जपले.
त्यांना आपलेसे केले.
कामावरती नितांत श्रद्धा आणि भक्ती ठेवून विठ्ठलाच्या पंढरीत कर्तुत्व सिद्ध करणारे *सदाशिव काका* म्हणून सर्वांच्या हृदयात घर करून राहिले.
जो आवडे सर्वांना,
तो आवडे देवाला....!
या नियतीच्या न्यायाने आम्हा तुम्हा सर्वांना सोडून आज ते स्वर्गस्थ झाले. त्याला निश्चितच *मोक्षलक्ष्मी* प्राप्त झालेली असणार यात संदेह नाही.
त्यांच्या देहातून मुक्त झालेल्या आत्म्याला मोक्ष लक्ष्मी निश्चितच प्राप्त झालेली असणार यात संदेह नाही.
तेंव्हा पुनश्च एकदा त्यांच्या आत्म्याला मनःपूर्वक अभिवादन करतो. आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.