मलिकवाडच्या युवकाची दत्तवाडमध्ये आत्महत्या

मलिकवाड प्रतिनिधी अमर माने 

मलिकवाड, तालुका चिकोडी येथील दत्तवाड- मलिकवाड मार्गावर असणाऱ्या दत्तवाड हद्दीतील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये मलिकवाडच्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली. अभिषेक अनिल आंबी (वय 23 रा. मलिकवाड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावच्या हद्दीत एका शेतातील जुन्या पत्र्याच्या शेडमध्ये अभिषेक आंबी याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. गुरूवारी रात्री याबाबत माहिती मिळताच फोटो त्याची ओळख पटविण्यात आली. अभिषेक कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. परंतु त्यानंतर तो परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. गुरूवारी रात्री दत्तवाड हद्दीतील शेडमध्ये त्याचा मृतदेह दोरीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत वैभव आंबी (वय 21) यांने कुरुंदवाड पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार ज्ञानदेव सानप हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.