कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांचा गणपतराव पाटील यांना पाठिंबा
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांना कुरुंदवाड नगरीचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व त्यांचे सुपुत्र नगरसेवक अभिजीत पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
आदरणीय साने गुरुजींच्या विचारांना मानून त्यांच्या विचारधारेवर आतापर्यंत वाटचाल केली आहे. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून माणसाला केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासकार्यात रावसाहेब पाटील यांची साथ बहुमूल्य ठरणार आहे, अशा भावना यावेळी गणपतराव पाटील यांनी व्यक्त केल्या आणि पाठिंब्यावर आभार मानले.
यावेळी देवराज मगदूम, सुनील कांबळे, आशिष मगदूम, साताप्पा बागडी, हसन देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या