विशालक्रांती न्युज वृत्ताची दखल, खोतवाडीतील नित्कृष्ट दर्जाहिन रस्त्याचे दुबार काॅंक्रीटिकरण, बांधकाम अभियंत्याचे कौतूक.
खोतवाडी - हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी माने मळा येथे खास. धैर्यशील माने यांचे फंडातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रस्त्याचे काॅंक्रीटीकरण करण्यात आले होते. सदर रस्त्याचे काम नित्कृष्ठ झाल्यामुळे एक महिन्यातच रस्त्याची खडी उचकटून रस्त्याला भेगा पडल्याने या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. असे वृत्त विशालक्रांती न्युज वर प्रसारित करण्यात आली होती, विशालक्रांतीच्या वृत्ताची दखल घेऊन बांधकाम अभियंता आकाश गिरी यांनी प्रत्यक्ष रस्ते कामाची पाहणी केली. यावेळी सदर रस्ता पुन्हा करून देण्याचे आश्वासन दिले होते.
सदर रस्ता काॅंन्ट्रक्टरकडून दुबार काॅंक्रीटीकरण करण्यास भाग पाडले. त्यामुळे बांधकाम अभियंता आकाश गिरी यांचे कौतूक होत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
टिप्पण्या